Pune Crime News Saam TV
क्राईम

Pune Crime News: अल्पवयीन विद्यार्थिनीवर ५९ वर्षीय व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार; घटनेनं पिंपरी चिंचवड हादरलं

Crime News: जेलमधून सुटल्यानंतर आता त्याने पुन्हा एकदा असं कृत्य केल्यानं पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला आणि त्याला मदत करणाऱ्या विद्यार्थिनीला अटक केली आहे.

Ruchika Jadhav

Pune:

पिंपरी चिंचवडमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील एका ५९ वर्षीय व्यक्तीविरोधत अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रावेत परीसरातील एका अकॅडमीच्या संचालकानेच हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे. मी तुला फिजिकली डेव्हलप करेल, तू माझ्याशी रिलेशनशिप ठेव, अस म्हणत संचालकाने विद्यार्थिनीसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची तक्रार पीडितेने केली आहे.

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अकॅडमीचा संचालक आणि एका माजी विद्यार्थीनी विरुद्ध पॉक्सो बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीवर या आधी दहा वर्षांपूर्वी देखील अशाच प्रकारचं कृत्य केल्याने कारवाई झाली होती. त्यावेळी देखील त्याला पोलिसांनी अटक केली होती.

जेलमधून सुटल्यानंतर आता त्याने पुन्हा एकदा असं कृत्य केल्यान पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी शेख आणि त्याला मदत करणाऱ्या विद्यार्थिनीला अटक केली आहे. दरम्यान या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT