Pune Crime News Saam TV
क्राईम

Pune Crime News: पुण्यात कुत्र्यावर एयरगनच्या छराने हल्ला; घटनेमागचं कारण ऐकून तुमचाही होईल संताप

Pune Street Dog News: कुत्रा (Dog) नेहमी त्रास देतो या कारणावरून त्याला एअरगनचा छरा मारून जखमी करण्यात आलंय. या प्रकरणी हडपसर (Hadapsar) पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ruchika Jadhav

सचिन जाधव

Pune Attack On Dog:

पुण्यात हडपसरमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. एका व्यक्तीने रागाच्याभरात कुत्र्याला एयरगनचा छरा मारून जखमी केलं आहे. हडपसर पोलीस स्टेशन हद्दीमधील “इन्केव्ह लोकमंगल सोसायटी” झेड कॉर्नर,मांजरी बुद्रुक येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कुत्रा (Dog) नेहमी त्रास देतो या कारणावरून त्याला एअरगनचा छरा मारून जखमी करण्यात आलंय. या प्रकरणी हडपसर (Hadapsar) पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अली रियाज थावेर या आरोपीस ताब्यात घेतलं आहे. हडपसर पोलीस या प्रकरणी अधित तपास करत आहेत.

दोन दिवसांपूर्वी पुण्यात बाणेर परिसरात गळफास लागल्याने कुत्र्याचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणी चतुर्शिंगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ही दुसरी घटना घडली आहे. अनेक व्यक्ती आपल्या घराच्या रक्षणासाठी कुत्रा पाळतात. घरी कोणतीही अनोळखी आणि नवीन व्यक्ती आली तर कुत्रा जोरजोरात भुंकू लागतो. त्याच्यासमोर कोणीही घरात शिरण्याची हिम्मत करत नाही. मात्र मुक्या प्राण्यांना पुण्यामध्ये विचित्र पद्धतीने त्रास दिला जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एका कुत्र्याने आपल्या मलकाचा जीव वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात टाकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये मालकावर काही व्यक्ती हल्ला करत असतात. आपला मालक संकटात असल्याचं पाहून कुत्रा तेथे धावत येतो आणि सर्व हल्लेखोरांना पळवून लावतो. यासह एक कुत्रा ट्रॅफीकमध्ये कार चालवत असल्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT