Pune Latest crime News : काही मित्र दारु पार्टी करण्यासाठी एकत्र जमले. गप्पा, मस्करीचा फड रंगला, पण त्याचवेळी एकाकडून नकळत बंदुकीचा ट्रिगर दबला अन् विपरीत घडलं. पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना घडली आहे. यामध्ये एकजण जखमी झालाय. पुणे पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. जखमीवर रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
पुण्यातील कोंढवा परिसरात मित्रासह दारु पार्टी करायला गेला होता. त्यावेळी बंदूक हाताळताना अंदाज नकळत गोळीबार झाला. त्यामध्ये एकजण गंभीर झाला. त्याच्या खांद्याला गोळी लागली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालाय. पोलीस याचा तपास करत आहे. प्रदीप सावंत (वय ३९) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
कोंढवा परिसरात झालेल्या गोळीबारानंतर परिसरात एकच खळबळ उडली. या गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, बंदूक हाताळताना अचानक गोळी सुटल्यामुळे हा प्रकार घडला आहे.
घटनास्थळी दोनजण दारू पार्टी करायला गेले होते. यावेळी अनिल चव्हाण नावाच्या व्यक्तीने गावठी पिस्तूल आणले होते. दारु पित असताना आरोपी पिस्तूल हातळत होता. त्याचवेळी अचानक चुकून गोळी सुटली आणि प्रदीप सांवत यांच्या खांद्याला लागली.या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल करत अनिल चव्हाण याला अटक केली आहे.
आरोपी चव्हाण याच्याकडे गावठी पिस्तूल कसे आले, याची चौकशी पोलीस करत आहेत. बेकायदेशीर पिस्तूल आणणे आणि सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्याचा प्रकार उघड झाल्याने पोलिसांनी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. या घटनेने कोंढवा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.