Pune Crime Saam Tv
क्राईम

Pune Crime News: पुण्यात शाळकरी मुलांची 'भाईगिरी'; दहावीच्या विद्यार्थ्यांनी केला अल्पवयीन मुलावर चाकू हल्ला

Student Attack on Minor Boy: पुण्यात रोज गुन्हेगारीच्या नवीन नवीन घटना घडत आहेत. आता एका दहावीच्या विद्यार्थ्यांनी अल्पवयीन मुलावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Crime in Khadak Police Station Area

पुण्यात चाकू हल्ल्याच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ झाली आहे. रोज नवीन नवीन प्रकरणं समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी बिर्याणी न दिल्यामुळं दुकानदारावर ग्राहकाने चाकू हल्ला केल्याची घटना घडली होती. आताही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ या. (Latest Crime News)

अल्पवयीन मुलावर चाकू हल्ला

पुण्यात (Pune) शाळकरी मुलांनी एका अल्पवयीन मुलावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भवानी पेठेतील रामोशी गेट परिसरात घडली. या हल्ल्यात दहावीच्या वर्गातील मुलगा गंभीर जखमी झाला (Student Attack on Minor Boy) आहे. या प्रकरणी खडक पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

याबाबत १५ वर्षीय मुलाने खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station Area) तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तक्रारदार अल्पवयीन मुलगा महापालिकेच्या एका शाळेत दहावीच्या वर्गात (10th Student) आहे. तर गुन्हा दाखल करण्यात आलेली चार मुले याच परिसरात महापालिकेच्या एका शाळेत दहावीच्या वर्गात शिकतात.

तक्रारदार मुलाचा दोन दिवसांपूर्वी एकमेकांकडे पाहण्यावरून एका मुलाशी वाद झाला होता. त्या मुलाने शाळेतील मित्रांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर मंगळवारी दुपारी तक्रारदार मुलगा रामोशी गेट परिसरातून घरी जात होता.

साखळी आणि बेल्टने बेदम मारहाण

त्यावेळी चौघांनी त्याला अडवले. त्याला शिवीगाळ केली. तुला मस्ती आली का? असे म्हणत मुलाला साखळी आणि बेल्टने बेदम मारहाण केली. त्याच्या छातीवर चाकूने वार केला. त्यावेळी नागरिकांनी हल्ला करणाऱ्या मुलांना रोखण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी याबाबत पोलिसांना (10th Student Attack on Minor Boy) कळवले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामोशी गेट चौकीतील पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. जखमी झालेल्या मुलावर ससून रूग्णालयात उपचार सुरू (Pune Crime) आहेत. मुलाची प्रकृती स्थिर आहे. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या ₹२००० खटाखट जमा होणार; तुम्हाला मिळणार की नाही? वाचा सविस्तर

Rent Agreement : नवा कायदा, डिपॉझिट जास्त घेततल्यावर घर मालकावर कारवाई होणार, वाचा नेमकं सत्य काय?

Health Care : उचकी थांबत नाहीये? मग करा हे सोपे घरगुती उपाय

Maharashtra Live News Update : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला

Office Hairstyles: मेसी वेणी आणि बबल पोनीटेल, ऑफिस आणि कॉलेजसाठी 5 मिनिटांत होतील अश्या झटपट 5 हेअरस्टाईल्स

SCROLL FOR NEXT