Pune Crime Saam Tv
क्राईम

Pune Crime: थंड वडापाव दिला म्हणून ग्राहक तापला, स्नॅक्स सेंटरचालकाला काचेची बरणी फेकून मारली

Pune Crime: थंड वडापाव दिल्याने ग्राहकाला संताप आला त्यानंतर त्याने स्नॅक्स सेंटर चालकाला मारहाण केलीय. याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवण्यात आलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

पुण्यातील बालेवाडी परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. थंड वडापाव दिल्याने एका ग्राहकाने स्नॅक्स सेंटर चालकाला मारहाण केल्याची घटना घडलीय. थंड वडापाव दिल्याने संतापलेल्या दोन जणांनी स्नॅक्स सेंटर चालकाला काचेची बरणी फेकून मारली. याप्रकरणी मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अंकुश कोंडीबा ढेबे असे मारहाण करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या तरुणासह त्याच्या एका मित्रावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पुण्यातील बालेवाडी भागात शिवकृपा स्नॅक्स सेंटर आहे. बुधवारी दुपारी १२ वाजता ढेबे व त्याचा एक मित्र स्नॅक्स सेंटरवर आले आणि त्यांनी जोशी यांना वडापाव मागितला. वडापाव मिळताच तो गार आहे, असं आरोपींनीा त्यांना सांगितलं. त्यावरून स्नॅक्स चालक आणि ग्राहकांमध्ये वाद सुरू झाला. या वादाचे रुपांतर भांडणात झाले.

त्यावेळी आरोपींनी दुकानातील चहाचा थर्मास खाली फेकून दिला. ढेबे याने काऊंटरवरील काचेची भरणी हातात घेऊन ती जोशी यांच्या दिशेने फेकून मारली. या घटनेत जोशींच्या डोक्याला व हाताला मार लागला. मारहाण केल्यानंतर त्या दोघांनी तिथून पळ काढला. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून पुढील तपास सुरू आहे.

चितळे बंधूंच्या दुकानावर दरोडा

काही दिवसापूर्वी पुण्यातील चितळे बंधूंच्या दुकानावर दरोडा पडला आहे. औंध बाणेर रोडवरील दुकान फोडून चोरट्यांकडून डल्ला मारला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आलाय. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली आहे. चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात रक्कम चोरल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पुणे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Year Special: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घराच्या घरी बनवा टेस्टी प्लम केक

Maharashtra Live News Update: प्रशांत जगताप यांचा राजीनामा जवळपास निश्चित

Rubaab Teaser: तुझ्यासारखी नको तूच पाहिजे...,लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार एक रुबाबदार लव्हस्टोरी

Jabrata: टीव्हीची प्रसिद्ध जोडी मोठ्या पडद्यावर; चित्रपटाचं रोमॅंटिक गाणं प्रदर्शित, रिलीज डेट काय?

आता WhatsApp Chat नको असलेले डिलिट करा, हवे असलेले ठेवता येणार, नवं फीचर आलं, कटकट संपली!

SCROLL FOR NEXT