पोलिस असण्याची बतावणी करणारा गुन्हेगार जफर शहाजमान ईराणी पोलीसांच्या ताब्यात Saam Tv
क्राईम

Pune Crime : हेल्मेट घालून यायचा, महिलांना धमकावून दागिने चोरायचा; पुण्यात तोतया पोलिसाला बेड्या

Crime: विश्रामबाग पोलिसांनी पोलिस असल्याची बतावणी करून लुटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. हेल्मेट घालून करत होता गुन्हे, पोलिसांनी हुशारिले सापळा रचत केली अटक.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विश्रामबाग पोलिसांनी, पोलिस असल्याची बतावणी करून लुटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. आरोपीचे नाव जफर शहाजमान ईराणी (वय ४१, रा. लोणीकाळभोर, पठारे वस्ती) असे आहे. पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे की, त्याने २० गुन्हे केले असून, एकूण २९ लाख ६७ हजार रुपयांची फसवणूक व लुटमार केली आहे. हे सर्व गुन्हे त्याने अवघ्या दीड वर्षात केले आहेत. विशेष म्हणजे ओळख लपवण्यासाठी तो प्रत्येक गुन्हा करताना हेल्मेट घालून वावरत असे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जफर हा एक सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर पुण्यासह इतर जिल्ह्यांमध्ये ७० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तो २०२३ मध्ये जामिनावर बाहेर आला होता. गुन्हे करताना तो हेल्मेट काढत नाही आणि चोरीच्या गाड्यांचा वापर करतो. तसेच, तो गाडीचा नंबर बदलून पोलिसांची दिशाभूल करतो.

एका महिलेची फसवणूक करून तिच्या दागिन्यांची जबरदस्तीने चोरी करणाऱ्या व्यक्तीविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा प्रकार घडला तेव्हा आरोपीने स्वतःला पोलिस अधिकारी असल्याचे सांगितले आणि महिलेच्या गळ्यातील गंठण व हातातील अंगठी पिशवीत ठेवण्यास भाग पाडले.

तपासादरम्यान, पोलिस उपनिरीक्षक मनोज बरुरे यांना संशयित जफर याच्याबद्दल माहिती मिळाली. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्याची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर विश्रामबाग पोलिस त्याच्या शोधात होते. एका ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो कैद झाला. पोलिसांनी त्याच्या चालण्याच्या आणि बोलण्याच्या लकबीवरून त्याची ओळख पटवली आणि त्याला अटक केली. याआधी, २०१७ मध्येही पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यावेळी त्याच्या घरातून दोन किलो सोने आणि ६४ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती.

जफरच्या कुटुंबियांसवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. त्यांना मदत करण्यासाठी जफर शहरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने २० गुन्ह्यांची कबुली दिली.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चंद्रपुरात वायू प्रदूषणाचा कहर; साडेतीन वर्षांत 325 जणांचा मृत्यू

Jamun Benefits: तुम्हाला पण जांभूळ खायला फार आवडतात? मग वाचा त्याने शरिराला कोणते फायदे होतात?

Anulom Vilom Benefits: प्रदूषणामुळे श्वसनाचे त्रास होतात? मग सकाळी १० मिनिटांसाठी करा हे सोपे योगासन

Ratnagiri: बाप्पाचं दर्शन घेऊन बीचवर मज्जा करायला गेले अन् अनर्थ घडला; ५ जणांचा बुडून मृत्यू, नावं आली समोर

Acidity : ॲसिडीटी, पोटदुखीमुळे तुमचं मुल खूप रडतंय? करा ‘हा’ घरगुती उपाय, मिनिटांत वाटेल बरे

SCROLL FOR NEXT