Pune Prostitution Racket News Saam Yv
क्राईम

Pune Crime : पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली नको ते धंदे; पोलिसांनी सापळा रचला अन् पुढे जे घडलं ते...

Pune Prostitution Racket News : पुण्यात थाई स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा विमानतळ पोलिसांनी पर्दाफाश केला. पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Alisha Khedekar

  • पुण्यात थाई स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरु असल्याचा पर्दाफाश

  • विमाननगर परिसरातील स्पा सेंटरवर पोलिसांची धडक कारवाई

  • मुख्य आरोपीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

  • मसाजच्या आडून देहव्यापार सुरु असल्याचे तपासात उघड

अक्षय बडवे, पुणे

पुण्यात 'थाई स्पा’च्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सापळा रचून विमानतळ पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सदर घटना विमान नगर येथील दत्त मंदिर चौक परिसरात घडली आहे. या घटनेनंतर विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात नेमकं चाललंय काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान नगर येथील दत्त मंदिर चौक परिसरात असलेल्या गुलमोहर रेजन्सी इमारतीमधील सिग्नेचर थाई स्पा येथे, स्पा सेंटरमध्ये मसाजच्या आडून सेक्स रॅकेट सुरू असल्याच्या तक्रारी काही दिवसांपासून विमानतळ पोलिस ठाण्यात सातत्याने येत होत्या. त्यानुसार पोलिसांनी गुप्तपणे खातरजमा केली.

खात्री पटताच शनिवारी सायंकाळी विमानतळ पोलिसांच्या पथकाने सापळा रचून स्पा सेंटरला घेराव घातला. ठरलेल्या प्लॅननुसार पोलिसांनी अचानक छापेमारी करत स्पा सेंटरवर धाड टाकली. या कारवाईत पाच तरुणींना रंगेहाथ पकडण्यात आले असून मुख्य आरोपी मेहबूब खान लष्कर (वय २८, रा. आसाम) याला अटक करण्यात आली आहे.

या कारवाईदरम्यान स्पा सेंटरमध्ये पाच तरुणी वेश्याव्यवसाय करताना आढळून आल्या. अधिक चौकशीत आरोपी मेहबूब खान याने या तरुणींना जास्त पैशांचे आमिष दाखवून स्पाच्या नावाखाली देहव्यापारात ढकलल्याचे निष्पन्न झाले. ग्राहकांकडून मिळणाऱ्या पैशांतून आरोपी स्वतःची उपजीविका करत असल्याचेही तपासात उघड झाले आहे. या घटनेनंतर पुण्यात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्य रेल्वेचा मध्यरात्रीपासून विशेष ब्लॉक; लोकलसेवा विस्कळीत

Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीया का साजरी करतात? माहित आहे का?

Iran: मोठी बातमी! इराणने घेतला मोठा निर्णय, भारतासह जगाला फटका बसणार

Maharashtra News Live Update: खेड तालुक्यात रस्त्याअभावी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा

अकोल्यात वाळू माफियांची दादागिरी, गुंडांना पाहून पोलिसांनीच पळ काढला; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT