Pune Crime News saam tv
क्राईम

Pune Crime: मित्रानेच मित्राला संपवलं, हात- पाय बांधून कचऱ्यात फेकलं; पुण्यातील भयंकर घटना

Pune Latest News: हात उसने घेतलेल्या पैशांवरून तरुणाचा खून करून मृतदेह बॉक्समध्ये पॅक करून कचऱ्यात टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यामधून समोर आला आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Gangappa Pujari

सचिन जाधव, पुणे

Pune Crime: पुण्यात हडपसरमधील हिंगणे मळा परिसरात कचऱ्यात पुठ्याच्या बॉक्समध्ये हात-पाय बांधलेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडला होता. त्या मृतदेहाचे गुढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. हात उसने घेतलेल्या पैशांवरून तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह बॉक्समध्ये पॅक करून कचऱ्यात टाकून दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून अधिक तपास सध्या सुरु आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, हात उसने घेतलेल्या पैशांवरून तरुणाचा खून करून मृतदेह बॉक्समध्ये पॅक करून कचऱ्यात टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यामधून समोर आला आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. इम्रान यासीन पटेल (वय २४, रा. उंड्री) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. निजाम्मोद्दीन पटेल (वय २८) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांत खूनाचा गुन्हा नोंद आहे

इम्रान पटेल तसेच निजाम्मोद्दीन दोघेही मुळचे कर्नाटकातील आहेत.पण निजाम्मोदीन गेल्या काही वर्षांपासून पुण्यात राहतो.तो फिल्टर दुरूस्ती तसेच विक्री व त्याचे स्पेअरपार्ट विक्री करतो. त्याचे स्वत:चे दुकान देखील आहे. तर इम्रान ४ वर्षापूर्वी पुण्यात आला होता. तो देखील निजाम्मोद्दीन सोबत दुरूस्ती व फिल्टर बसविण्याचे काम करत होता.

दोघांमध्ये एक लाखावरून वादावादी झाली होती. निजामने इम्रानला बहिणीच्या लग्नासाठी दीड वर्षांपुर्वी एक लाख रुपये दिले होते, आता इम्रान परत पैसे देत नव्हता. शुक्रवारी इम्रान निजामकडे गेला होता. तेव्हा त्यांच्यात पैशांवरून वादावादी झाली. वादानंतर त्यांच्यात भांडण झाले. मारहाणीत इम्रानचा मृत्यू झाला. इम्रान मयत झाल्याचे लक्षात आल्यानंतर निजाम घाबरला. त्याने मृतदेह पुठ्याच्या बॉक्समध्ये टाकून तो बॉक्स कचऱ्यात टाकला असल्याचे समोर आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT