Bihar Crime  Saam Tv
क्राईम

Crime: ८ महिन्यांच्या गर्भवतीवर सामूहिक बलात्कार, बंदुकीचा धाक दाखवत हैवानांनी शरीराचे लचके तोडले

Bihar Crime: बिहारमध्ये ८ महिन्यांच्या गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. वेदना होत असल्यामुळे ३ जण महिलांच्या मदतीला आले. त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला.

Priya More

बिहारमध्ये ८ महिन्यांच्या गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. बेतिया जिल्ह्यातील लाथर पोलिस ठाण्याच्या हद्दातील एका गावात ही घटना घडली. ८ महिन्यांच्या या गर्भवती महिलेला नारकटियागंज येथे नेण्यात आले आणि बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली तर एक आरोपी फरार आहे. पोलिस या आरोपीचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बेतियामध्ये २६ वर्षीय ८ महिन्यांच्या गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार केला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना १५ जून रोजी दुपारी घडली. पोलिसांनी १६ जून रोजी गुन्हा दाखल केला आणि गर्भवती महिलेला जीएमसीएचमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. महिलेला प्रचंड वेदना होत आहेत. या घटनेमुळे बिहारमध्ये खळबळ उडाली आहे.

आरोपी पीडित महिलेला उपचाराचा बहाणा करून घेऊन गेले. बंदुकीचा धाक दाखवून त्यांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. बलथरच्या अतिरिक्त एसएचओ अर्चना सिन्हा यांनी सांगितले की, गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. शेख टोला गावातील नसीर मियां (४० वर्षे) आणि नसरुल्लाह मियां (३५ वर्षे) या दोघांना पोलिसांनी अटक करण्यात आली आणि त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आली आहे. तिसरा आरोपी गुड्डू मीर (२५ वर्षे) मुरली गावातील रहिवासी असून तो फरार आहे. त्याचा पोलिस शोध घेत आहेत.

पीडित महिलेचा पती काश्मीरमध्ये मजूर म्हणून काम करतो. १५ जून रोजी पीडित महिलेला वेदना होत होत्या. महिलेला उपचारात मदत करण्याच्या बहाण्याने आरोपी तिला नरकटियागंज येथे घेऊन गेले. एका महिलेच्या घरी नेल्यानंतर तिन्ही आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यानंतर महिलेला मजरडवा येथे आणण्यात आले आणि संध्याकाळी उशिरा तिला तिथेच सोडून देण्यात आले. महिलेची प्रकृती गंभीर असून तिने एका नातेवाईकाला फोन करून याबाबतची माहिती दिली. त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT