mumbai crime  saam Tv
क्राईम

Mumbai Crime: प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलगी गरोदर; लग्नाला नकार मिळाल्यानंतर उचललं टोकाचं पाऊल

Mumbai Crime: नवी मुंबईत एक धक्कादायक घटना घडलीय. गरोदर असलेल्या एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केलीय. प्रियकराने लग्नाला नकार दिल्यानंतर या मुलीने जीवन संपवलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका युवकाला अटक केलीय.

Bharat Jadhav

Navi Mumbai Crime:

नवी मुंबईत येथे एका धक्कादायक घटना घडलीय. एका १७ वर्षाच्या गरोदर मुलीने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केलीय. प्रेम प्रकरणातून प्रेयसी गरोदर राहिल्यानंतर प्रियकराने लग्नाला नकार दिल्यानंतर अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Latest News)

अल्पवयीन मुलगी ही ५ महिन्याची गरोदर होती. गोवंडी येथे राहणाऱ्या एका मुलाशी या मुलीचे प्रेमसंबंध होते. त्यातून ही मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर प्रियकराने तिला लग्नाला नकार दिला. मुलगी गरोदर राहिल्याची माहिती कुटुंबियांना समजल्यानंतर त्यांनी तिला विचारणा केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यानंतर या मुलीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. याबाबत मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच पोलिसांनी प्रियकराला अटक केली. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

शाळकरी मुलांकडून सामूहिक अत्याचार

अशीच एक घटना बीडमध्ये घडली. १४ वर्षीय ३ शाळकरी मुलांनी ८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार बीड शहरात घडला. पीडित(८ वर्षीय) चिमुकली बीड शहरामध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होती. तिचे वडील शहरात रिक्षा चालवतात, तर आई गृहिणी आहे.

रविवारी सायंकाळी पीडित मुलगी तिच्या घराजवळ खेळत होती. परिसरात राहणाऱ्या ३ मित्रांनी याच संधीचा फायदा घेत, तिला जवळच असलेल्या पडक्या घरात घेऊन गेले, त्यानतंर तिच्यावर तिघांनीही अत्याचार केला. याचवेळी चिमुकलीने आरडाओरड केल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीला चिमुकलीचा आवाज आला. आवाज येताच त्या व्यक्तीने चिमुकलीच्या दिशेने धाव घेत आरोपी मुलांच्या तावडीतून तिची सुटका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दिव्यांग शेतकऱ्यांच्या कांद्याला अवकाळी पावसाचा फटका

Sugarcane juice: उस आणि मशिन न वापरता घरच्या घरी तयार करा उसाचा रस

Heart Disease Diet : चाळीशीनंतरही होणार नाहीत ह्रदयविकाराच्या समस्या, आहारात करा या ४ पदार्थांचा समावेश; डॉक्टरांनी दिला सल्ला

Designer Blouse: लग्नसराईत प्लेन साडीत पण दिसाल उठून, ट्राय करा हे ७ ट्रेंडी युनिक स्वस्त डिझायनर ब्लाऊज

Chocolate Dry fruit Shake: उन्हाळ्यात प्या चॉकलेट ड्राय फ्रुट शेक; राहाल दिवसभर फ्रेश

SCROLL FOR NEXT