nanded police shoot man trying to set cylinder on fire Saam Digital
क्राईम

Nanded Crime News : पोलिसांवर तलवार उगारताच त्याच्यावर झाला बेछूट गाेळीबार, वाचा नांदेड शहरातील थरारक घटना

हे भांडण सोडवण्यासाठी हरदिपसिंघ गेले असता शेरसिंघ त्यांच्यामागे तलावर घेऊन लागला.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी

Nanded News :

नांदेड जिल्ह्यात पॅरोलवर बाहेर आलेल्या आरोपीने शेजाऱ्यासोबत भांडण केले. या भांडणात शेजाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. या घटनेची तक्रार झाल्यानंतर पाेलिस संबंधित संशयित आराेपीस पकडण्यासाठी गेले असता त्याने दहशत निर्माण करण्यासाठी नांदेड पाेलिसांवर तलवार उगारली. त्यानंतर झालेल्या धुमश्चक्रीत पोलिसांनी स्वसरंक्षणासाठी संशयितावर गोळीबार करुन त्यास अटक केली. (Maharashtra News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार शेरसिंघ गिल हा एका खून प्रकरणातून पॅरोलवर बाहेर आला होता. शेजारी असलेल्या हरदिपसिंघ पाठी यांच्या भावासोबत त्याचे काही कारणाने भांडण झाले.

हे भांडण सोडवण्यासाठी हरदिपसिंघ गेले असता शेरसिंघ त्यांच्यामागे तलावर घेऊन लागला. पळत असताना हरदिपसिंघ खाली पडले आणि त्यांना हुदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान शेरसिंघ यास पकडण्यासाठी पोलिस घटनास्थळी गेले असता त्याने गॅस सिलेंडर पेटवण्याची धमकी दिली. तसेच पोलिसांवर तलवार उगारली. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या पायाच्या दिशेने चार ते पाच गोळ्या झाडल्या. दोन गोळ्या त्याच्या पायावर लागल्या. त्यानंतर पाेलिसांनी त्याला पकडले तसेच अटक केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT