Dehradun Loot Video saam Tv
क्राईम

Dehradun Loot Video: पोलीस राष्ट्रपतींच्या सुरक्षेत व्यस्त; दरोडेखोरांनी डाव साधला; ज्वेलरी शॉप लुटले, CCTV फुटेज व्हायरल

Loot Video : देहराडून येथील राजपूर रस्त्यावरील ज्वेलरी शॉपमध्ये हा दरोडा पडलाय.

Bharat Jadhav

Dehradun Loot Video:

उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये आज स्थापना दिवस साजरा केला जातोय. या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या देहरादूनला आल्या आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात आलेत. याचा फायदा घेत ५ दरोडेखोरांनी शहरातील ज्वेलरी शॉपमध्ये दरोडा टाकला आणि कोट्यवधी रुपयांचे दागिने लंपास केले. (Latest News)

हा दरोडा देहराडून येथील राजपूर रस्त्यावरील रिलायंस ज्वेलरी शॉपमध्ये पडला. बंदुकीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी कोट्यवधी रुपयांचे दागिने लूटले आहे. दरम्यान पोलीस घटनास्थळी पोहोचून या चोरट्यांचा तपास करत आहेत. पाच चोरट्यांच्या या टोळीने आधी ज्वेलर्समध्ये रेकी केली आणि नंतर हेल्मेट आणि मास्क घालून ज्वेलर्सच्या दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील १८ कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवत त्यांना एका खोलीत बंद केले. त्यानंतर दुकानातील सर्व दागिने साफ केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शहरात राष्ट्रपती मुर्मू ह्याचा कार्यक्रम होता. सर्व पोलिसांची ड्युटी तिकडे लावण्यात आली होती. सर्व पोलीस ड्युटीवर असल्याचं संधी साधत दरोडेखोरांनी शॉप लुटलं. बंदुकीच्या जोरावर ही घटना घडल्यानंतर हल्लेखोरांनी दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर (रेकॉर्डर) काढून घेतला.

पोलीस घटनास्थळी पोहोचले असून घटनेचा बारकाईने तपास करत असल्याचं एसपी सिटी सरिता डोबल यांनी सांगितले. या चोरीच्या घटनेमुळे शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. पोलिसांसमोर या चोरांना पकडणं आव्हान बनलंय. मात्र हे चोर लवकरच गजाआड असतील, असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस SIR विरोधातील लढाईला कायदेशीर बळ?

काशी विश्वनाथाच्या कळसाचं सोनं चोरीला? PMO कडे तक्रार,मंदिर प्रशासनानं आरोप फेटाळले

Friday Horoscope: अडकलेली कामं पूर्ण होतील, या 4 राशींच्या नशीबी आज पैसा; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

16 ऑक्टोबरला सरकारविरोधात CJPचा तिरंगा मोर्चा, कनॉट प्लेसचं 'जंतरमंतर' होणार

Fact Check: व्हॉट्सअॅपवर 'NO' लिहाल अकाऊंटमधील पैसे गमवाल? छोट्याश्या चुकीमुळे कष्टाचे पैसे घालवून बसाल?

SCROLL FOR NEXT