Parbhani Sand Mafia Viral Video: Saamtv
क्राईम

Parbhani News: वाळू माफियांची दहशत! अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत पळवला टिप्पर; भररस्त्यात सिनेस्टाईल थरार| VIDEO

Parbhani Sand Mafia Viral Video: भररस्त्यात टिप्पर अडवून सिने स्टाईल पद्धतीने तो पळवल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Gangappa Pujari

राजेश काटकर, परभणी|ता. २१ एप्रिल २०२४

राज्यात अनेक ठिकाणी वाळू अवैध वाळू उपसा सुरूच असल्याचे चित्र आहे. धक्कादायक बाब म्हणजे राज्यातील अनेक भागात वाळू माफियांची दबंगिरीही पाहायला मिळत असून कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ला करायलाही ते धजावत नाहीत. असाच धक्कादायक प्रकार परभणीमधून समोर आला आहे.

परभणी जिल्ह्यात अनेक नद्यांंमध्ये अवैध वाळू उपसा सुरू असल्याच दिसत आहे. अशातच पाथरीमध्ये कारवाई करण्यासाठी आलेल्या महसूल कर्मचाऱ्यांवर वाळू माफियांनी हल्ला करुन टिप्पर पळवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भररस्त्यात टिप्पर अडवून सिने स्टाईल पद्धतीने तो पळवल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, उपविभागीय अधिकाऱ्यांनी वाळू उपसा करणारा एक टिप्पर पकडला होता. हा टिप्पर पकडल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना तहसिल कार्यालयात घेऊन जाण्यास सांगितले होते. मात्र टिप्पर तहसिल कार्यालयात घेऊन जात असतानाच वाळू माफियांनी पाठलाग करुन टिप्पर अडवला आणि कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत तो टिप्पर पळवून नेला. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाळू माफियांना अधिकाऱ्यांचेच अभय?

दरम्यान, परभणीच्या पाथरीमध्ये सर्रासपणे वाळू उपसा सुरू असून गोदावरीच्या पात्राची अक्षरशः चाळण केली आहे. या वाळू माफियांना सरकारी अधिकारी, राजकीय नेत्यांचे अभय आहे का? त्यामुळेच त्यांची अधिकाऱ्यांशी धक्काबुक्की करण्यापर्यंत मजल गेली का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT