Palghar Crime News Saam Tv
क्राईम

Palghar Crime News: शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं अपहरण; घातपाताचा संशय, पोलिसांची आठ पथकं तयार

Palghar Crime: पोलिसांच्या ताब्यात असलेले चार आरोपी आणि इतर मिळालेल्या माहितीच्या आधारावर आज संध्याकाळपर्यंत या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला जाईल असं आश्वासन पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिल आहे .

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपेश पाटील, साम प्रतिनिधी

शिवसेना शिंदे गटाचे डहाणूचे पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर आलीय. अशोक धोडी यांच्या शोधासाठी पोलिसांनी आठ पथकं तयार केली आहेत. धोडी यांच्या शोधासाठी हे पथक विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. अशोक धोडी यांच्यासोबत घातपात झाल्याचा संशय पोलिसांना आहे. पालघर स्थानिक गुन्हे शाखेकडून आतापर्यंत चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. अशोक धोडी यांच्या शोधासाठी सहा पथक रवाना करण्यात आली आहेत. पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचं प्रकरणावर विशेष लक्ष आहे.

पालघर मधील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणात आता आठ पथक विविध ठिकाणी तैनात असल्याची माहिती पालघर पोलीस अधीक्षकांकडून देण्यात आली आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेले चार आरोपी आणि इतर मिळालेल्या माहितीच्या आधारावर आज संध्याकाळपर्यंत या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला जाईल असं आश्वासन पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिल आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT