Odisha Crime News Saam tv
क्राईम

Odisha News: क्रूरतेचा कळस! तरुणीची हत्या करत केले ३१ तुकडे; धक्कादायक घटनेनं देश हादरला

Man Killed Girlfriend 31 pieces: नराधमाने तिच्या शरीराचे तब्बल ३१ तुकडे केले आहेत. या घटनेमुळे आता पुन्हा एकदा संपूर्ण देश हादरून गेलाय.

Ruchika Jadhav

Odisha Crime News:

श्रद्धा वालकरसारखी आणखी एक संतापजनक घटना ओडिसामधून समोर आली आहे. एका तरुणीच्या प्रियकराने तिची क्रूरपणे हत्या केलीये. हत्या केल्यावर नराधमाने तिच्या शरीराचे तब्बल ३१ तुकडे केले आहेत. या घटनेमुळे आता पुन्हा एकदा संपूर्ण देश हादरून गेलाय. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, हत्या झालेली तरुणी अवघ्या २२ वर्षांची होती. बुधवारी ती आपल्या आईबाबांना सांगून घरातून बाहेर पडली. रात्र झाली तरी मुलगी घरी परतली नाही म्हणून तिच्या कुटुंबियांनी तिची शोधाशोध सुरू केली. मुलीचा काहीच तपास लागत नसल्याने शेवटी त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बरंगपूर जिल्ह्यातील जंगलात शोधकार्यात तरुणीचा मृतदेह सापडला आहे. तिच्या मृतदेहाचे ३१ तुकडे करून जमिनीत पुरण्यात आले होते. पोलिसांनी हे सर्व तुकडे बाहेर काढले असून शवविच्छेदनासाठी पाठवलेत. तरुणीची हत्या नेमकी केव्हा झाली. तिला जमिनीत केव्हा पुरण्यात आलं या सर्वांची महिती रिपोर्ट आल्यानंतर समजेल.

पोलीस (Police) चौकशीत पुढे अशी माहिती समोर आली की, तरुणीचे ज्या मुलावर प्रेम होते त्याच्याशी तिला लग्न करायचे होते. आरोपीने सुरुवातीला तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात खेचले. नंतर तिने लग्नासाठी हट्ट केल्यावर त्याने तिला सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र तरुणीला याचा नकार होता.

लग्नाचा हट्ट घेऊन तरुणी थेट तरुणाच्या घरी पोहचली होती. घरी आल्यावर तिने पाहिले की तिच्या प्रियकराचे आधिच लग्न झाले होते. तसेच त्याला ५ मुलंही आहेत. मात्र तरीही तरुणीने त्याच्याशी लग्न करण्याचा हट्ट धरला. संतापात प्रियकर आणि त्याच्या पत्नीने तरुणीवर वार करत तिची हत्या केली. पोलिसांनी आता प्रियकर आणि त्याच्या पत्नीलाही ताब्यात घेतलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भरत गोगावले पालक मंत्री होणार यात शंका नाही - आमदार महेंद्र थोरवे

Kidney Stone Symptoms : पाठदुखी करू नका दुर्लक्षित, असू शकतो किडनी स्टोनचा धोका; डॉक्टरांनी सांगितली ४ गंभीर लक्षणं

कोरड्या त्वचेसाठी सर्वात भारी उपाय! 'दूध-हळदीचा' फेसपॅक

Tax free income: कोणकोणत्या कमाईवर सरकार टॅक्स लावत नाही?

ऑपरेशन टायगर फेल? उद्या मातोश्रीवर येतो; ओमराजे निंबाळकरांचा उद्धव ठाकरेंना निरोप?

SCROLL FOR NEXT