Crime News x
क्राईम

Crime News: बक्षिशीचा हट्ट, पैशांची मागणी; नर्सच्या अमानवी वर्तनामुळं नवजात बाळाचा मृत्यू

National News : बाळाचा जन्म झाल्यानंतर बक्षीस म्हणून पैसे न दिल्याने एका नर्सने बाळाच्या कुटुंबाशी वाद घातला. वादामुळे दीड तासानंतर बाळाला एसएनसीयूमध्ये दाखल करण्यात आले. उपचार न झाल्याने बाळाचा मृत्यू झाला.

Yash Shirke

रुग्णालयामध्ये बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाचे वडील किंवा कुटुंबातील वयस्कर व्यक्ती डिलिव्हरीमध्ये मदत करणाऱ्या नर्स मंडळींना बक्षीस म्हणून पैसे देतात. बाळाच्या जन्माच्या आनंदात पैसे दिले जातात. पण या बक्षीसापायी एका लहान बाळाचा मृत्यू झाला आहे. सदर घटना पटना शहरातील गुरु गोविंद सिंह रुग्णालयात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवजात बाळाला जन्मानंतर लगेचच एसएनसीयूमध्ये (स्पेशल न्यूबॉर्न केअर यूनिट) दाखल करायचे होते. पण बक्षीसांच्या पैश्यांवरुन नर्सने बाळाच्या कुटुंबाशी वाद घातला. वादामुळे तब्बल दीड तासानंतर बाळाला केअर यूनिटमध्ये दाखल करण्यात आले. तोपर्यंत बाळाची प्रकृती गंभीर झाली होती. एसएनसीयूमध्ये दाखल केल्यानंतर थोड्या वेळात बाळाचा मृत्यू झाला.

रुग्णालायातील कर्मचाऱ्यांच्या अमानुष वर्तनामुळे नवजात बाळाचा मृत्यू झाला. ही माहिती समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने उपविकास आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशीसाठी एक समिती स्थापन केली. समितीने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा मान्य केला. 'नवजात बाळाला वेळेवर उपचार मिळाले असते, तर कदाचित त्याचे प्राण वाचले असते', असे समितीतील सदस्यांनी म्हटले.

शाहदरा येथील रहिवासी कन्हैया प्रसाद यांच्या पत्नीने ६ मे रोजी सकाळी मुलाला जन्म दिला. जन्मानंतर पाच मिनिटे बाळाचे रडणे ऐकू न आल्याने डॉक्टरांनी बाळाची तपासणी केली. बाळाला एसएनसीयूमध्ये दाखल करावे लागेल असे डॉक्टरांनी म्हटले. पण स्टाफ नर्सने बाळाच्या वडिलांकडून पैसे मागायला सुरुवात केली. तिने बाळाला एसएनसीयूमध्ये दाखल करण्यास विलंब केला. उपचार न झाल्याने बाळाचा दुर्दैवी अंत झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा अमेरिकेच्या दबावामुळे द्यावा लागला - शेतकरी नेते -राकेश टिकैत

Konkan To Akkalkot : स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणातून अक्कलकोटसाठी थेट बससेवा सुरु; कुठून धावणार? तिकीट दर काय?

Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

Hair Dye: केमिकल डाय नको! केसांना द्या नैसर्गिक काळा रंग; चहापत्तीपासून घरच्या घरी तयार करा हेअर कलर

SCROLL FOR NEXT