Shocking Viral News Saam Tv News
क्राईम

Metrimony साईटवर ओळख झाली, तरुणाने लग्नाआधीच तरुणीला गोव्याला नेलं; शारीरिक संबंधानंतर काय घडलं?

Shocking Viral News : पीडित तरुणी भोपाळची रहिवासी आहे. ती नोएडाच्या एका मोठ्या आयटी कंपनीत काम करते. कुटुंबियांना मुलीच्या लग्नाची काळजी वाटत होती. त्यामुळे तरुणीने मॅट्रोमोनियल साईटवर तिचं प्रोफाईल बनवलं आणि लाईफ पार्टनरचा शोध घेतला.

Prashant Patil

नोएडा : भोपाळची एक तरुणी नोएडात सॉफ्टवेअर इंजीनिअर एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होती. लग्न करण्यासाठी या तरुणीनं एका मॅट्रोमोनिअल साईटवर नोंदणी केली. या साईटच्या माध्यमातून ही तरुणी लग्नासाठी मुलाच्या शोधात होती. एका मुलाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर दोघांमध्येही बोलणं झालं. पण त्यानंतर धक्कादायक प्रकार घडेल, याची जराही कल्पना त्या मुलीला नव्हती. ज्या मुलासोबत तिने लग्नासाठी बोलणं केलं, त्याने तिचा विश्वास जिंकला. त्याच्यासोबत मैत्री केली आणि लग्नाचं वचन दिलं. पण नंतर असं काही घडलं ज्यामुळे त्या पीडित मुलीला पोलिसांमध्ये तक्रार दाखल करावी लागली.

मिळालेल्या माहितीनुसार, त्या तरुणाने मुलीला लग्नाचा शब्द दिला होता. पण लग्नाआधीच त्याने तरुणीसोबत संबंध ठेवले. तरुणाने तिला गोवा, कर्नाटक आणि शिमलामध्ये फिरायला नेलं. धक्कादायक बाब म्हणजे त्या तरुणानं तिच्याकडे तब्बल ६५ लाखांची मागणी केली. पण तरुणीला माहित झालं की, ज्या मुलासोबत ती लग्न करणार आहे, तो विवाहित आहे.

तरुणीला हे समजताच तिने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. ही खळबळजनक घटना नोएडा येथील सेक्टर ५८ मध्ये घडल्याची माहिती समोर आली आहे. पीडित तरुणी भोपाळची रहिवासी आहे. ती नोएडाच्या एका मोठ्या आयटी कंपनीत काम करते. कुटुंबियांना मुलीच्या लग्नाची काळजी वाटत होती. त्यामुळे तरुणीने मॅट्रोमोनियल साईटवर तिचं प्रोफाईल बनवलं आणि लाईफ पार्टनरचा शोध घेतला.

आरोपी तरुणाने तरुणीचा मोबाईल त्याच्याजवळ ठेवला. त्याने तरुणीच्या खात्यात असलेले २५ लाख रुपयेही त्याच्या खात्यात वळवले. त्यानंतर मुलीच्या मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन अॅपद्वारे २५ लाखांपर्यंतचा पर्सनल लोनही घेतला. आरोपीने तरुणीला फसवल्याचं तिला सुरुवातीला समजलं नाही. तसंच आरोपीने पीडितेला सांगितलं होतं की, तो एका कंपनीचा मालक आहे आणि त्याचा मोठा बिझनेस आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Crime: लातूर हादरले! राहत्या घरात तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, गळ्यावरून चाकू फिरवला

Maharashtra News Live Update: बिबट्याच्या अवयवांची तस्करी, पुण्यातील संगमवाडीत वनविभागाचा सापळा

Maharashtra Weather : मान्सूनने संपूर्ण देश व्यापला! राज्यात आजही मुसळधार पाऊस, 'या' जिल्ह्यांना अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

आंबा की केळं? आरोग्यासाठी कोणतं फळ अधिक फायदेशीर?

Vastu Shastra: बाथरूममध्ये चुकूनही ठेवू नका 'या' ७ वस्तू; पैसे पण जातील आणि आरोग्यावरही होईल वाईट परिणाम

SCROLL FOR NEXT