Bride Threatened the Groom in Honeymoon Night Saam Tv News
क्राईम

Crime News : 'लांब हो, मला हात लावू नको'; लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूने धमकी दिली, कारण ऐकून नवऱ्याच्या टाळकं फिरलं अन्...

Bride Threatened the Groom in Honeymoon Night : प्रयागराजच्या नैनी परिसरात राहणाऱ्या कप्तान निषाद याचा विवाह २९ एप्रिल रोजी करछना डीगा येथील लक्ष्मी नारायण निषाद यांची मुलगी सितारा हिच्याशी संपन्न झाला होता. लग्नापर्यंत सर्वकाही ठिक होतं.

Prashant Patil

उत्तर प्रदेश : राजा रघुवंशी हत्याकांडानंतर असाच धक्कादायक प्रकार पुन्हा समोर आला आहे. येथे नववधूने लग्नाच्या रात्रीच नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली, आणि याचे कारण म्हणजे तीचं लग्नापूर्वीपासून असलेले प्रेमसंबंध. बायकोचं ऐकून नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकलीय. नेमकं प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया.

प्रयागराजच्या नैनी परिसरात राहणाऱ्या कप्तान निषाद याचा विवाह २९ एप्रिल रोजी करछना डीगा येथील लक्ष्मी नारायण निषाद यांची मुलगी सितारा हिच्याशी संपन्न झाला होता. लग्नापर्यंत सर्वकाही ठिक होतं. पण हनीमूनच्या रात्री जे घडलं, त्यांने कप्तानला मोठा धक्का बसला. 'हात लावलास तर तुकड्यांमध्ये मिळशील', असं सितारानं हनीमूनच्या रात्री म्हटल्याचं कप्तानने म्हटलं आहे. कप्तानच्या म्हणण्यानुसार, सिताराने त्याला चाकू दाखवत धमकी दिली की, तिला स्पर्श करू नये, स्पर्श केल्यास त्याचे ३५ तुकडे होतील. तीचं दुसऱ्यावर प्रेम असून तिला तिच्या प्रियकरासोबत जायचं आहे. यानंतर सितारा पलंगावर झोपली आणि कप्तान सोफ्यावर झोपला.

सलग ३ रात्री सिताराने चाकू दाखवून त्याला धमक्या देणं सुरू ठेवलं. अखेर कप्तानाचा संयम सुटला आणि त्याने आपल्या आईला याबाबत माहिती दिली, त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. कप्तानचे वडील राम आसरे यांनी सांगितलं की, त्यांनी सुनेला तिच्या खोलीतून बोलावलं आणि तिला काय झालं आहे, असं विचारलं. 'माझं अमनवर प्रेम आहे. मला त्याच्यासोबतच राहायचंय. तोच माझ्या सर्व गोष्टींचा मालक आहे. दुसरा कोणीही नाही,' असं सिताराने स्पष्टपणे सांगितलं. सिताराचे वडीलही आले, पण काही उपयोग झाला नाही. त्यानंतर गावातील लोकांना बोलावून एक करार करण्यात आला, ज्यात सितारा कुठेही जाणार नाही, ती सून बनून त्यांच्यासोबतच राहील आणि तिच्या प्रियकराला विसरून जाईल, असं ठरलं. तरीसुद्धा, बंद खोलीत सितारा माझ्या मुलाला त्रास देत राहिली, असं राम आसरे यांनी सांगितलं.

अखेरीस राम आसरे यांना हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत घेऊन जावं लागलं. दरम्यान, सितारा मध्यरात्री घराची भिंत ओलांडून तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, प्रेमसंबंध आणि विवाह यांसारख्या विषयांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT