newly married woman pays with life for selfie at naldurg fort dharashiv  Saam Digital
क्राईम

Dharashiv : 10 दिवसांपूर्वी झाला हाेता विवाह, पतीला पत्नीचा पाहावा लागला मृतदेह; नेमकं काय घडलं नळदुर्ग किल्ल्यात?

हे दाम्पत्य तुळजापुर तालुक्यातील हंगरगा तुळ येथील असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. अवघ्या दहा दिवसांपूर्वीच निलाेफर आणि आमीर यांच्या विवाहनंतर शेख कुटुंबियावर काळाने घाला घातला.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग येथील किल्ल्यातील बुरूजावर उभा राहुन सेल्फी काढताना तोल जावुन पडल्याने नवविवाहित महिलेचा मृत्यू झाला आहे. निलोफर अमीर शेख असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

दहा दिवसांपूर्वीच निलाेफर आणि आमीर यांचा विवाह झाला हाेता. या विवाहानंतर ते फिरण्यासाठी नळदुर्ग किल्ला येथे आले हाेते. नळदुर्ग किल्ल्यातील उपळाई बुरूजावर पतीसमवेत सेल्फी काढताना तोल जावुन निलाेफर खाली पडल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

हे दाम्पत्य तुळजापुर तालुक्यातील हंगरगा तुळ येथील असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. अवघ्या दहा दिवसांपूर्वीच निलाेफर आणि आमीर यांच्या विवाहनंतर शेख कुटुंबियावर काळाने घाला घातला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT