Kalyan Crime News Saam Tv
क्राईम

Shocking : भाच्यानं केली मामाची हत्या, कल्याणमध्ये खळबळ, धक्कदायक कारण समोर

Kalyan Crime News : कल्याण शहरात घरगुती वादातून भाच्यानं मामाची हत्या केली. लोखंडी शिडीला डोकं आपटल्याने हा मृत्यू झाला. आरोपीला पोलिसांनी एका तासात अटक केली असून घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.

Alisha Khedekar

कल्याणमध्ये भाच्यानं मामाचा लोखंडी शिडीला आपटून हत्या केली

घटना घरगुती वादातून घडली असून सीसीटीव्हीमध्ये कैद झाली

आरोपी गणेश पुजारीला पोलिसांनी एका तासात अटक केली

नात्याला काळिमा फासणारी घटना

कल्याणमधून नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. घरगुती वादातून भाच्याने मामाचा काटा काढला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला पोलिसांनी काही तासांमध्ये बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी तरुणाचं नाव गणेश रमेश पुजारी असं आहे तर, मृत व्यक्तीचं नाव मारिअप्पा राजू नायर असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मामा मारिअप्पा राजू नायर आणि भाचा गणेश पुजारी यांच्यामध्ये शुल्लक कारणावरून बाचाबाची झाली. हा वाद एवढा टोकाला गेला की संतापलेल्या भाच्याने रागारागात मामाचं डोकं घरात असलेल्या एका लोखंडी शिडीला आदळलं. या झटापटीत मारिअप्पा यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

याप्रकरणी पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मारिअप्पा नायर यांच्या मृत्यूनंतर आरोपी गणेशने घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिसांनी सापळा रचून गणेशचा मागोवा घेतला. गणेश हा कल्याण रेल्वे स्थानकावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र पोलिसांनी तो पळून जाण्याच्या एका तासाच्या आत त्याच्या मुसक्या आवळल्या.

दरम्यान आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या खडकपाडा पोलीस ठाण्यात आरोपी गणेश पुजारी याची चौकशी सुरु आहे. मात्र मामा भाच्यामधलं वादाचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. प्राथमिक माहितीनुसार घरगुती वादातूनच ही हत्या झाली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घटनेचे नेमके कारण समजून घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. याप्रकरणी आरोपी गणेश याला काय शिक्षा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

Maharashtra News Live Update: चालत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला; युवती जखमी

Face Care: चेहऱ्यावर वारंवार दिसतात व्हाइटहेड्स? डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय नक्की करुन बघा, ५ दिवसात दिसेल फरक

Thumb sucking in children: लहान बाळांची अंगठा चोखण्याची सवय कशी मोडाल?

SCROLL FOR NEXT