Navi Mumbai News Saam Digital
क्राईम

Navi Mumbai News: चोरी, घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक; रिक्षा, बॅटऱ्याही केल्या हस्तगत

Navi Mumbai News: चोरी, घरफोडी करणाऱ्या हुसेन कमरुद्दीन शेख (२३) व अजीम उर्फ मुन्ना सलीम शेख (१९) या दोन सराईत चोरांना रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. एमआयडीसी हद्दीतील चार गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे उघड झाले

Sandeep Gawade

Navi Mumbai News

चोरी, घरफोडी करणाऱ्या हुसेन कमरुद्दीन शेख (२३) व अजीम उर्फ मुन्ना सलीम शेख (१९) या दोन सराईत चोरांना रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. एमआयडीसी हद्दीतील चार गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे उघड झाले असून पोलिसांनी एक रिक्षा, चोरी केलेल्या चार बॅटरीसह एक लाख ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

घणसोली सेक्टर-१५ मध्ये रस्त्यालगत उभ्या असलेल्या डम्परमधील दोन बॅटरी चोरल्या होत्या. तसेच साईबाबा मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील पैसे चोरले होते. याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसी टीव्हीची पाहणी केली होती. बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी हुसेन कमरुद्दीन शेखला घणसोलीतील एका हॉटेल समोरून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता अजीम उर्फ मुन्ना याने डम्परच्या बॅटरी तसेच साईबाबा मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील पैसे चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर कोपरखैरणे परिसरातून अजीम उर्फ मुन्नाला अटक करून चोरलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shilpa Shinde: 'अंगूरी भाभी' जेलमध्ये जाणार? प्रोड्यूसरवर हरेसमेंटचे खोटे आरोप भोवले, अभिनेत्रीच्या अटकेची मागणी

Pune Hospital: पुण्यातील आरोग्य विभाग 'व्हेंटिलेटर'वर, पालिका रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचा तुटवडा; धक्कादायक आकडेवारी समोर

एक नंबरचे स्वार्थी आणि ढोंगी असतात 'ही' माणसं! आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 'या' २ सवयींवरून ओळखा

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाचे दमदार आगमन

Mumbai Crime : मुंबईत भयंकर घडलं! आईच्या बॉयफ्रेंडचं टाळकं सटकलं, अमानुष मारहाणीत ४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT