Nashik Crime  Saam Tv
क्राईम

Nashik Crime: नाशिक मध्यरात्री हादरले! घरात घुसला, अंगावर पेट्रोल टाकून पेटवलं, नंतर बायको- सासूच्या अंगावर झोपला

Crime News Nashik: नाशिकमध्ये नवऱ्याने आपल्या बायको आणि सासूला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. आरोपीविरोधात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी पीडित महिलेने केली आहे.

Priya More

अभिजित सोनावणे, नाशिक

नाशिकमध्ये नवऱ्याने बायको आणि सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सोनांबे गावामध्ये ही घटना घडली. नवऱ्याने आधी स्वत:ला पेटवून घेतलं त्यानंतर तो बायको आणि सासूच्या अंगावर जाऊन झोपला. या घटनेत दोघेही गंभीररित्या जखमी झाले आहेत. आरोपीने बायकोच्या घरात घुसून तिचे घर देखील पेटवून दिलं. या घटनेमुळे नाशिक हादरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहल शिंदे (१९ वर्षे) आणि अनिता शिंदे या दोघी मायलेकी घरामध्ये झोपल्या असताना त्याठिकाणी स्नेहलचा नवरा आला आणि त्याने दोघींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. स्नेहल आपल्या आईसोबत नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सोनांबे गावमध्ये राहते. त्याठिकाणी रात्री उशिरा तिचा नवरा केदार हंडोरे आला. त्याने आधी स्वत:ला पेटवून घेतलं त्यानंतर तो बायको आणि सासूच्या अंगावर झोपला. या घटनेमध्ये तिघेही गंभीर जखमी झाले आहेत.

केदार हंडोरेने मध्यरात्री दीडच्या सुमारास स्नेहलच्या घरात घुसून ज्वलनशील पदार्थ टाकून तिचे घर पेटवून दिले. त्याचसोबत स्वत:ला पेटवून घेत त्या दोघींना देखील जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला. केदार हंडोरेने असं कृत्य का केलं यामागचे कारण अद्याप समोर आले नाही. स्नेहल आणि तिच्या आईची प्रकृती गंभीर आहे. स्नेहल ५० टक्के भाजली तर तिची आई ६५ टक्के भाजली. दोघींवर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर स्नेहलचा नवरा आरोपी केदार देखील या घटनेत ७० टक्के भाजला असून त्याच्यावर देखील उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT