नाशिकमध्ये पुन्हा एकदा पूर्व विधानसभा मतदारसंघात राडा झालाय. गेल्या दोन दिवसापासून नाशिकमध्ये हाणामारीच्या घटना घडत आहेत. आज भाजप उमेदवार राहुल ढिकले आणि शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ मारामारी झालीय. राहुल ढिकले यांच्या कार्यकर्त्यांनी गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांची गाडी फोडली. गणेश गीते यांच्याकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप राहुल ढिकले यांच्या समर्थकांनी केलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांकडून स्लीप वाटप होते, परंतु ते पैसे वाटत असल्याचा आरोप ढिकले यांच्या समर्थकांनी केलाय. गेल्या दिवसांपूर्वी याच कारणामुळे हाणामारी झाली होती. आज पुन्ही भाजप आणि शरद पवार गटात राडा झाला.
पंचवटी परिसरात ही हाणामारीची घटना घडलीय. गणेश गीते यांचे कार्यकर्ते स्लीप वाटण्याच्या नावाने पैसे वाटत होते, असा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. यानंतर दोन्ही पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली.
आता पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये कार्यकर्त्यांनी तक्रार दिलीय. दरम्यान गणेश गीते हे आधी भाजपमध्ये होते तसेच ते गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय होते. भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळेल अशी आशा त्यांना होती. परंतु त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर त्यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली. गीते यांचे अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये आहेत, त्यामुळे भाजपविरुद्ध निवडणूक लढवत असल्याने हा राडा झाल्याचं सांगितले जात आहे.
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सावतानगर परिसरात भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. स्लीप वाटण्यावरून दोन्ही पक्षातील कार्यकर्ते एकमेकांना भिडलेत. भाजप आणि ठाकरे गटाच्या दोन्ही समर्थकांची अंबड पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी झाली होती. सुधाकर बडगुजर यांची गुंडांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.