Minor girl molested  Saam Tv
क्राईम

Nashik Crime : धक्कादायक! नाशिकमध्ये १० वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग, शिक्षक अटकेत

Rohini Gudaghe

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही नाशिक

राज्यामध्ये बालअत्याचार आणि विनयभंगाच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत असल्याचं समोर येतंय. आता नाशिकमध्ये एका खाजगी क्लासमधील शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलिसांनी संबंधित शिक्षकास अटक केल्याची माहिती मिळत आहे. सिडको परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे.

१० वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

याबाबत सविस्तर वृत्त असं की, नाशिकच्या सिडको परिसरात १० वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग (Nashik Crime) झालाय. खाजगी क्लासेस घेणाऱ्या शिक्षकानेच विनयभंग केल्याची माहिती मिळत आहे. उपेंद्रनगरमधील एका खाजगी ट्युशन सेंटरमधून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. इयत्ता पाचवीमध्ये शिकणारी मुलगी क्लासरूममध्ये एकटी होती. तेव्हा संबंधित शिक्षकाने तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचं समोर आलंय.

खाजगी क्लासमध्ये धक्कादायक प्रकार

घटनेनंतर पीडित मुलगी क्लासवरून घरी आली होती. परंतु दुसऱ्या दिवशी ती क्लासला जाण्यास नकार देत (Crime News) होती. त्यामुळे पीडितेच्या आईने तिला विश्वासात घेत तिच्याशी संवाद साधला. त्यानंतर पीडित मुलीने आईला घडलेला प्रकार सांगितला. हे ऐकल्यानंतर पीडितेच्या आईच्या पायाखालची जमिनच सरकली. त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.

पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

या सगळ्या प्रकारानंतर नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात विनयभंग आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात (Minor girl molested) आलाय. संशयित शिक्षकाला अंबड पोलिसांनी अटक केलीय. आरोपीचं वय ३२ वर्ष असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. राज्यात बदलापूर बाल लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच नाशिक शहरात पुन्हा एकदा ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे, या घटनेमुळे सिडको परिसरामध्ये (Molestation news) संतापाचं वातावरण असल्याची माहिती मिळतेय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli Politics : मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच विरोधात बॅनरबाजी, प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं

Mumbai Crime : पार्किंगवरून भांडण, महिलेकडून विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी; भीतीपोटी वृद्धाने संपवले आयुष्य

Special Story: हमास, हिजबोल्ला एकवटले, इस्त्राईलला घेरले; मोसाद विरूद्ध मुस्लिम संघर्षाची इनसाईड स्टोरी

Jitada Fish : चविष्ट 'जिताडा' समुद्रातून होतोय गायब, मच्छिमारांच्या हातीही लागेना; काय आहे कारण? पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Updates : वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने, घटनास्थळी पोलीस तैनात

SCROLL FOR NEXT