Nashik Crime Saam Tv
क्राईम

Nashik Crime: नाशिकमध्ये चाललंय काय? मध्यरात्री हत्येचा थरार, डोक्यात दगड घालून एकाला संपवलं

Nashik Police: नाशिकमध्ये एका व्यक्तीची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. नाशिकच्या फुलेनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे.

Priya More

अभिजित सोनावणे, नाशिक

नाशिकमध्ये एका व्यक्तीची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली. नाशिकच्या फुलेनगरमध्ये हत्येचा हा थरार घडला. काही अज्ञात व्यक्तींनी रस्त्यात गाठून एका व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून त्याला जागीच संपवलं. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. मृत व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या पेठ रोडवरील फुलेनगरमधील गौडवाडीमध्ये ही हत्येची घटना घडली. संजय तुळशीराम सासे या व्यक्तीची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली. महापालिकेच्या ५६ नंबर शाळेसमोर हा हत्येचा थरार घडला. मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास त्यांची हत्या करण्यात आली.

काही अज्ञात व्यक्तींनी संजय सासे यांना वाटेत गाठून त्यांच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. संजय सासे हे बाबागिरी करत असल्याची स्थानिकांची माहिती. याच कारणावरून त्यांची हत्या झाल्याचा संशय आहे. रुपाली संजय सासे यांच्या फिर्यादीवरून याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका संशयिताला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विरारमध्ये डंपर खाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

Court Attack : कोर्टावर दहशतवादी हल्ला; 8 जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

SCROLL FOR NEXT