Nashik Crime Google
क्राईम

Nashik Crime: कौटुंबिक भांडणाचा राग डोक्यात शिरला; हैवान बापाने स्वतःच्याच पोराचा गळा आवळला

Nashik Crime: कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने आपल्या नऊ वर्षाच्या मुलाचा गळा आवळून खून केलाय. ही घटना नाशिकमधील आम्रपाली परिसरात घडलीय. याप्रकरणाचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तरबेज शेख, साम प्रतिनिधी

नाशिक शहरात सलग दुसऱ्या दिवशी हत्या झाल्याची घटना घडलीय. कौटुंबिक वादामुळे हैवान बनत एका व्यक्तीनं स्वतःच्याच नऊ वर्षीय मुलाची हत्या केल्याची घटना आज नाशिकमध्ये घडलीय. भांडणाचा राग डोक्यात गेल्यानंतर दारूच्या नशेत एका व्यक्तीनं आपल्या मुलाचा गळा आवळला.ही घटना नाशिकच्या उपगनगर भागातील आम्रपाली परिसरात घडली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत घटनेचा सखोल तपास केलाय. सुमित पुजारी असं आरोपी वडिलांचं नाव आहे. सुमित पुजारीने दारुच्या नशेत आपल्या ९ वर्षाच्या मुलाची हत्या केलीय.

बायको नांदायला येईना, जावयानं सासऱ्याचा जीव घेतला

कौटुंबिक वादातून जावयाने सासू, सासरे आणि मेहुण्यावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सासऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील रामहिंगणे गावात घडलीय. याप्रकरणी आरोपी जावयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सासरमधील तिघांवर चाकू हल्ला केल्यानंतर जावई फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

अडीच वर्षांपासून पत्नीला नांदवायला पाठवत नाही. तसेच कोर्टात पोटगीसाठी दावा केल्यामुळे जावई मंगेश सलगर प्रचंड संतापले होते. याच रागातून त्याने २७ एप्रिल रोजी रात्रीच्यावेळी सासू, सासरे आणि मेहुण्यावर चाकू हल्ला केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये भीषण अपघात, २ जणांचा मृत्यू

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! २ लाखांपर्यंतचे कर्जमाफ; पण कुणाला मिळणार लाभ? राज्य सरकारच्या योजनेत नेमकं काय?

Weather Update : मोठी बातमी! अखेर 'तो' क्षण आला; पुढील काही तासांत मान्सून धडकणार, 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Mumbai Rain : वरुणराजाचं थाटात आगमन! मुंबई-उपनगरात काळे ढग दाटले, मुसळधार पाऊस सुरू

French Toast Recipe: सकाळी झटपट करा टेस्टी फ्रेंच टोस्ट; लहानमुलं पोटभर करतील नाश्ता

SCROLL FOR NEXT