Couple Ends Lives Days Before Son's Wedding 
क्राईम

ह्रदयद्रावक! मुलाच्या लग्नाची तयारी सुरु असतानाच आई-वडिलांनी संपवले आयुष्य

Nashik News : नाशिकमध्ये मुलाच्या लग्नाच्या तयारीदरम्यान शहा दाम्पत्याने विष घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून पोलिस तपास सुरू आहे. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

Namdeo Kumbhar

Couple Ends Lives Days Before Son's Wedding : पोटच्या पोराच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच आई-वडिलांनी विष घेऊन आयुष्य संपवल्यामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नाशिकमधील टिळकवाडी भागात ही ह्रदयद्रावक घटना घडली आहे. दाम्पत्यांनी टोकाचे पाऊल का उचलले? याबाबत अद्याप कोणताही माहिती मिळालेली नाही. पोलिसांकडून तपास सुरू आहे. पण लग्नाची तयारी सुरू होत असतानाच आई-वडिलांनी टोकाचे पाऊल उचलल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

घरात मुलाच्या विवाहाची तयारी सुरू असताना आई-वडिलांनी जीवन संपवले. टिळकवाडी भागात शहा दाम्पत्याने विष सेवन करून आत्महत्या केली. त्यामुळे नाशकात खळबळ उडाली. मुलासोबत भोजनानंतर व्यावसायिकाने पत्नीसह आत्महत्या केली. मुलाच्या लग्नाची तयारी घरात सुरू असताना आई-वडिलांच्या आत्महत्येने शहा कुटुंबास धक्का बसलाय. आत्महत्येचे कारण अस्पष्ट, शहा दाम्पत्याचा व्हीसेरा राखून ठेवला. वीस दिवसांवर धाकट्या मुलाचा लग्न सोहळा असताना आई-वडिलांनी आत्महत्येने केलेल्या खळबळ उडाली आहे.

जयेश शहा आणि रक्षा शहा यांनी रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर झोपण्याआधी विष घेतले. त्यामुळे त्यांना रात्री ११ च्या सुमारास गंभीर अवस्थेत सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण त्यांनी प्राण सोडले. शाह यांचा मोठा मुलगा बांधकाम व्यवसायिक आहे, त्यानं रविवारी रात्री आईला फोन केला, पण बोलताना अडथळल्या. त्यामुळे त्याने घरी जाऊन पाहणी केली, ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यानंतर रुग्णालयात दाखल केला. उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहा दाम्पत्यांनी टोकाचा निर्णय का घेतला? याचा तपास घेण्यासाठी पोलिसांनी त्यांची खोली तपासली. त्यामध्ये संशयास्पद कोणताही गोष्ट अथवा चिठ्टी आढळली नाही. नियमित औषधांसह चष्मा व इतर साहित्य आढळले. पोलिसांनी कुटुंबातील इतर लोकांची चौकशी केली, पण आत्महत्येचं कारण उघड झालेले नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

होर्मुजमधल्या केबल्सवरुन इराणचा इशारा, तेलाच्या आगीत इंटरनेटची ठिणगी?

Maharashtra News Live Update: सागर नाईक यांनी भर सभेत महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांना सुनावले खडेबोल

ट्रम्प यांनी ओकली भारताविरोधात गरळ, ट्रम्प यांच्याकडून भारताचा नरक असा उल्लेख

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

SCROLL FOR NEXT