Nanded saam tv
क्राईम

Nanded Crime News: नांदेड हादरलं! पोटच्या लेकीला आई-वडिलांनी संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Nanded Latest News: नांदेडमधून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगरमध्ये आई - वडिलांनी पोटच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक कृत्य केलं आहे. १७ वर्षीय लेकीला विळ्याने वार करून हत्या केली आहे.

Vishal Gangurde

संजय सूर्यवंशी, नांदेड

Nanded Crime News:

नांदेडमधून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगरमध्ये आई - वडिलांनी पोटच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्यांनी १७ वर्षीय लेकीला विळ्याने वार करून हत्या केली आहे. या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात आई-वडिलांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (Latest marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्हयातील हिमायतनगर येथे ऑनर किलिंगची घटना घडली. परजातीय मुलासोबत पळून गेलेली मुलगी परत घरी आली. पण तिने मुलाशी लग्न करण्याचा हट्ट मुलीने धरला. याच कारणामुळे मुलीच्या आई-वडिलांनी आपल्याच पोटच्या मुलीची हत्या केली. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विळ्याने वार करून 17 वर्षीय अंकिता पवार हिची हत्या केली. मुलगी झोपेत असताना आई - वडिलांनी विळ्याने वार करून तिची हत्या केली. या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात मृत मुलीच्या आई -वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

नांदेडच्या हिमायतनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या अंकिताचं एका मुलावर प्रेम होतं. ती त्याच्यासोबत घर सोडून पळून गेली होती. काही दिवसानंतर पु्न्हा घरी आली. मुलगी घर सोडून पळून गेल्याने घरचे खूप चिडले होते. घरी आलेल्या मुलीने त्या मुलाशी लग्न करण्याचा हट्ट आई-वडिलांकडे धरला. त्यानंतर आई-वडिलांनी रागाच्या भरात लेकीचा संपवण्याचा कट रचला.

लेक झोपेत असताना आई-वडिलांनी तिच्यावर विळ्याने वार केले. या हल्ल्यात १७ वर्षीय अंकिताचा मृत्यू झाला. या घटनेने नांदेड हादरलं आहे. या प्रकरणी अंकिताच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. (Nanded Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT