Yavatmal Crime News Saam TV
क्राईम

Nagpur Crime News: गणेशपेठ बसस्थानक परिसरात फळविक्रेत्याची चाकू भोसकून हत्या; नागपूरमधील खळबळजनक घटना

Crime News: योगश देखील बसकडे प्रवाशांना वळवण्याचे काम करत होता. यावरून त्याच्यात आणि आरोपींमध्ये वाद झाला. याच वादातून त्याची हत्या झाली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त

साम टिव्ही ब्युरो

Nagapur News:

नागपुरमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीये. गणेशपेठ बसस्थानक परिसरात एका फळ विक्रेत्याचा चाकू भोसकून खून करण्यात आलाय. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. सदर घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, योगेश उमरे असं मृत फळ विक्रेत्याचं नाव आहे. चेतन बगमारे, चेतन पाटील आणि अन्य साथीदारांनी मिळून योगेशवर हल्ला केल्याचा आरोप करण्याता आलाय.

मृतक योगेश उमरे हा फळ विक्रीचा व्यवसाय करत होता. यासोबतच तो बस स्थानक परिसरातील चालणाऱ्या ट्रॅव्हल्स एजन्सीसोबत कमिशनवर कामही करत होता. गणेशपेठ बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल्स व्यवसायिकांचे व्यवसाय आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात बस स्थानकातून बाहेर पडणाऱ्या ग्राहकांना आपल्याकडे वळवण्यासाठी कमिशन स्वरूपात लोकांना नेमण्यात येतं.

योगश देखील बसकडे प्रवाशांना वळवण्याचे काम करत होता. यावरून त्याच्यात आणि आरोपींमध्ये वाद झाला. याच वादातून त्याची हत्या झाली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. तसेच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध सुरू आहे.

मित्रानेच केली मित्राची हत्या, महिन्यानंतर हत्येचा उलगडा

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथे देकील हत्येची एक घटना उघडकीस आली आहे. येथे एका तरूणाची त्याच्याच मित्रानेच हत्या केलीये. गेल्या महिन्याभरापासून हा तरुण बेपत्ता होता. त्यानंतर आता त्याच्या मित्रानेच त्याची हत्या केल्याचे उघड झालेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ बदलाच्या हालचाली?

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! दोन्ही राष्ट्रवादीची अचानक बैठक, कोअर कमिटीनं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण काय?

Cabinet Reshuffle : राज्यातील ५ मंत्री बदलणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांच्या हालचाली, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Kojagiri Purnima 2026: कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीच्या कृपेसाठी चुकवू नका ‘या’ गोष्टी

Soan Papdi Recipe: यंदा दिवाळीत घरी बनवा हलकी, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी सोनपापडी, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT