Eight year old girl molested at kamptee in Nagpur Saam Tv
क्राईम

Nagpur Crime News : भयंकर! नागपुरात ८ वर्षीय मुलीचा विनयभंग

Rohini Gudaghe

पराग ढोबळे, साम टीव्ही | नागपूर

बदलापूरमधील चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या घटनेवरून राज्यात संताप व्यक्त होत असतानाच आता नागपूर जिल्ह्यातही अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे एका आठ वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. कामठीमध्ये आठ वर्षीय मुलीचा शेजारी राहणाऱ्या ५० वर्षीय व्यक्तीने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे कामठी शहरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

नक्की काय घडलं?

याबाबत सविस्तर वृत्त असं की, नागपूरमध्ये कामठी शहरात एका ५० वर्षीय व्यक्तीने पीडित मुलीला खाऊचे आमिष (Nagpur news) दाखवले. घरात कोणीही नसल्याची संधी साधून त्याने या आठ वर्षाच्या मुलीचा विनयभंग केला. त्यानंतर पीडित मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईने पोलीस ठाणं गाठलं. तक्रार नोंदिवल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.

आरोपी कोण आहे?

आदेश, असं आरोपीचं नाव असून त्याला अटक करण्यात (minor girl molested) आलीय. घरी कोणी नसल्याने शेजारी राहणाऱ्या आठ वर्षीय बालिकेला खाऊ विकत घेऊन देण्याचे आमिष दाखवून घरात बोलावलं. पीडित मुलगी एकटी असल्याची संधी साधून आरोपीने तिचा विनयभंग केला. घडलेला प्रकार पीडितेने आईला सांगितल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी पोक्सोसह अन्य कलमांतर्गत गुन्हे नोंदवून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

कोलकातामधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर शारिरीक अत्याचार केल्यानंतर हत्या झाल्याची घटना मागील आठवड्यात समोर आली होती. त्यापाठोपाठ आता राज्यात ठाणे, बदलापूर पुण्यातून देखील अशा घटना समोर आल्या (Nagpur Crime News) आहेत. नागपूरमध्ये देखील अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याचं समोर आलंय. या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतंय. तर राज्यात पुन्हा एकदा महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आलाय. चिमुकल्या मुलींवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात संतापाची लाट आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT