Mumbra Crime News Saam Tv
क्राईम

Mumbra Crime News : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मृत व्यक्तीवर गुन्हा दाखल

Mumbra Crime : मुंब्रामध्ये एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पण या प्रकरणातील आरोपी मृत असल्याची माहिती समोर आली आहे.

Yash Shirke

Mumbra News : ठाणे जिल्ह्यामध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका मृत व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही घटना ठाणे जिल्ह्यातील मुंब्रामध्ये घडल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, मुंब्रा येथे पीडितेच्या आईने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपीच्या विरुद्ध पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत कलम ६१ (१) च्या अंतर्गत गुन्हा नोंदवला. पण आरोपीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. असे असूनही एफआयआरमध्ये आरोपीच्या मृत्यूची वेळ आणि परिस्थितीचा उल्लेख करण्यात आला नसल्याचे म्हटले जात आहे.

आरोपी मुंब्रा येथे वास्तव्याला होता. त्याने शेजारी राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीशी मैत्री केली. पुढे त्या मुलीचा फायदा उचलला. जून ते ऑगस्ट २०२४ या दरम्यान आरोपीने पीडितेवर अनेकदा अत्याचार केला. या प्रकरणाची माहिती स्थानिक पोलिसांना देऊन पीडितेच्या आईने पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद मांडली, अशी माहिती समोर आली आहे.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या घरच्यांच्या विरोधाला न जुमानता आरोपीने अल्पवयीन मुलीशी लग्न केले. त्यानंतर मुलगी गरोदर राहिली आणि १४ फेब्रुवारी रोजी तिने एका मुलाला जन्म दिला. दरम्यान एफआयआरमध्ये आरोपीचा मृत्यू झाल्याचे उल्लेख न केल्याने गदारोळ माजल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

कितीही खासदार फोडा, उरावर भगवा फडकवणार, ओमराजेंच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडली

Spring Roll Recipe: घरच्या घरी बनवा टेस्टी स्प्रिंग रोल; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT