Maval Crime News SAAM DIGITAL
क्राईम

Mumbai Crime News: खळबळजनक..! सार्वजनिक शौचालयात महिलेचा मृतदेह आढळला जळालेल्या अवस्थेत; घातपाताचा संशय

Crime News: मुंबईतील मुलुंड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai Crime News

मुंबईतील मुलुंड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलुंड येथील एका महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या घटनेने परीसरात भितीचे वातावरण पसरले आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड पश्चिमेतील (दि.२९) रविवारी रोजी बीएमसी गार्डनजवळील सार्वजनिक शौचालयात एका महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत शौचालयात आढळून आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ११.१५ च्या सुमारास वसंत सार्वजनिक उद्यानाजवळील सार्वजनिक शौचालयातून धूर निघत असल्याचे काही लोकांना दिसले. त्यानंतर तिथे उपस्थित लोकांनी लगेचच सुरक्षा रक्षकांना सपंर्क साधला. सुरक्षा रक्षकांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. त्यानंतर महिलेला तातडीने नजीकच्या मुलुंड रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेची माहिती पोलिसांकडून महिलेच्या पतीस देण्यात आली. सोमवारी पहाटे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. जेव्हा घटना घडली तेव्हा शौचालयाचा दरवाजा आतून बंद होता. पोलिसांना घटनास्थळावरुन कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. महिलेच्या शवविच्छेद अहवालानंतरच ही आत्महत्या आहे की हत्या हे स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT