Woman Booked For Killing a Cobra Saam TV
क्राईम

CCTV Video: किंग कोब्राला निर्दयीपणे मारलं; हायक्लास सोसायटीमधील महिलेविरोधात गुन्हा दाखल

Crime News: सदर महिला सापाला वाचवू शकली असती. मात्र अतिशय क्रूरतेने तिने सापाला संपवलं. यावेळी तिच्या चेहऱ्यावर अजिबात भीती नव्हती. सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

Ruchika Jadhav

Woman Booked For Killing a Cobra:

मुंबईतील वसईमध्ये एका महिलेने घरात घुसलेल्या किंग कोब्रा सापाला ठार मारल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे या महिलेवर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. रुबीना असं या महिलेचं नाव आहे. पेटा इंडियाच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा व्हिडीओ वनविभागाकडे सादर केला. त्यानंतर महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

किंग कोब्रा सापापासून माणसाला धोका आहे. मात्र त्याचा जीव घेणे कायद्याने गुन्हा आहे. तुम्ही अशा विषारी प्राण्यांपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून दुसरीकडे जाऊ शकता. तसेच सर्प मित्रांना बोलावून सापांना निसर्गअधिवासात सोडता येते. मात्र या महिलेने तसे न करता सापाला तिथेच मारलं. साप आपल्या संरक्षणासाठी एका सायकल मागे लपत होता. मात्र महिलेने त्याला तेथून बाहेर काढून मारुन टाकलं आहे.

वन उपसंरक्षक (डहाणू विभाग), मधुमिता एस यांनी टाइम्स ऑफ इंडिया या माध्यम संस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, दुर्मिळ जातीच्या किंग कोब्रा सापाला मारल्यामुळे महिलेविरोधात वन्यजीव संरक्षण कायदा 1972 च्या कलम 9, 39 आणि 51 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर महिला सापाला वाचवू शकली असती. मात्र अतिशय क्रूरतेने तिने सापाला संपवलं. यावेळी तिच्या चेहऱ्यावर अजिबात भीती नव्हती. सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. पेटाने हाच व्हिडीओ वनअधिकाऱ्यांना दिला आहे. घरात परिसरात कुठेही जर तुम्हाला साप किंवा विषारी प्राणी आढळला तर महाराष्ट्र वन विभागाचा हेल्पलाइन क्रमांक 1926 यावर संपर्क साधावा. नागरिक स्थानिक अग्निशमन दलालाही कॉल करू शकतात, कारण त्यांनाही साप पकडण्याचे प्रशिक्षण दिले जाते. किंवा सर्प मित्रांना बोलावून सापांना निसर्गअधिवासात सोडता येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

SCROLL FOR NEXT