Mumbai Crime News  Saam Tv
क्राईम

Mumbai Crime: पुण्याच्या आयटी इंजिनिअर तरुणीवर मुंबईत सामूहिक बलात्कार, आधी हॉटेलमध्ये नंतर कारमध्ये...

Mumbai Police: पुण्याच्या आयटी इंजिनिअर तरुणीवर मुंबईतल्या कांदिवलीमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Priya More

मुंबईमध्ये पुण्याच्या आयटी इंजिनिअर तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणीला शीतपेयातून गुंगीच्या गोळ्या देऊन ४ जणांनी सामूहिक बलात्कार केला. कांदिवलीतील एका हॉटेलमध्ये आणि कारमध्ये ही घटना घडली. आरोपींनी तरुणाला तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून ३० लाख रुपये आणि दोन आयफोन उकाळले. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही मूळची कर्नाटकची आहे. ती पुण्यातील एका कंपनीमध्ये आयटी इंजिनिअर म्हणून काम करते. या तरुणीची २०११ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून मुंबईच्या कांदीवलीमध्ये राहणाऱ्या हरसल्ला खान या तरुणासोबत ओळख झाली. सुरूवातीला मैत्री आणि नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. हरसल्ला खानने पीडित तरुणीला लग्नाचे आमीष दाखवून तिला मुंबईत भेटण्यासाठी बोलावले.

ठरल्याप्रमाणे पीडित तरुणी या तरुणाला भेटण्यासाठी मुंबईत आली. कांदिवलीमधील एका हॉटेलमध्ये त्यांची भेट झाली. त्यानंतर हरसल्ला खानने तिला शीतपेयात गुंगीच्या गोळ्या मिक्स करून दिल्या. तरुणीला गुंगी आल्यानंतर हरसल्लाने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर हरसल्ला तिला कारमधून पुण्याला घेऊन गेला. पुण्याला जात असताना देखील त्याने तरुणीवर कारमध्ये बलात्कार केला. त्यानंतर त्याने आपल्या ३ मित्रांना बोलावून घेतलं. या चौघांनी मिळून तरुणीवर आळीपाळीने बलात्कार केला. यामधील काही आरोपींनी तरुणीवर अनैसर्गिक अत्याचार देखील केला.

तसेच आरोपींनी पीडीत तरुणीचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. आरोपींनी तिच्याकडून ३० लाख रुपये आणि २ आयफोन घेतले. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून काळेपडळ पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास कांदिवली पोलिस करत आहेत. चारही आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महायुतीत भाजपला कडू का नकोत? प्रहारच्या विलिनीकरणाला भाजपचा विरोध?

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव पिकअप उलटला; २ मुलांसह १२ जणांचा मृत्यू

Bengaluru Rain: बेंगळूरमध्ये पावसाचा हाहाकार; हॉस्पिटलजवळ भिंत कोसळली, ७ जणांचा मृत्यू

Nanded: पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; विजेचा धक्का लागून २ तरुणांचा मृत्यू

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट, पडद्यामागं जोरदार हालचाली

SCROLL FOR NEXT