Mumbai Crime आरोपीला घेऊन जाताना पोलीस  Saam Tv
क्राईम

Mumbai Crime: दोन मुलांसाठी नवऱ्यानं घेतला पत्नीचा जीव; दिवसाढवळ्या महिलेची हत्या

Mumbai Crime: पती-पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद चालू होते. मुलांच्या ताबा मिळावा म्हणून नवऱ्यानं पत्नीची भरदिवसा चाकूने हल्ला करत तिची हत्या केली.

Bharat Jadhav

महेंद्र वानखेडे, साम प्रतिनिधी

मिरा भाईंदरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आलीय. भररस्त्यात दिवसाढवळ्या महिलेची हत्या झाल्याची घटना मिरारोडच्या नयानगर घडलीय. दोन मुलाच्या ताब्यासाठी नवऱ्यानं पत्नीवर चाकू हल्ला करत तिचा खून केला. ही घटना मिरारोडच्या नयानगरमधील एन.एच.शाळेसमोरील रस्त्यावर घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास नया नगर पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,मृत महिलेचे नाव अमरीन खान वय वर्षे ३६ आहे तर आरोपी पतीचे नाव नदीम खान ३७ वर्ष आहे. प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून पती पत्नीमध्ये वाद सुरू होते. पती नदीम खान आणि अमरीन खान यांना दोन मुलं आहेत. नदीम यांना दोन्ही २ मुलांचा ताबा हवा होता. त्यावरुन नवरा बायकोमध्ये वाद सुरू होता. मुलांचा ताबा देण्यास अमरीन यांचा नकार होता. त्याचा राग नदीमच्या मनात होता, त्याच रागातून त्याने पत्नी अणरीन यांच्यावर भर दिवसा चाकू हल्ला करत तिची अस्मिता अनिल इमारती समोरील रस्त्यावर हत्या केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT