Crime News Saam tv
क्राईम

माता न तू वैरिणी! बहिणीला फसवण्यासाठी पोटच्या पोराचा जीव घेतला, ९ महिन्याच्या चिमुकल्याला छतावरून फेकलं

Crime News : उत्तर प्रदेशमधील बलियातील एका महिलेनं आपल्या दुश्मनीसाठी पोटच्या पोराचा बळी घेतला. मोठ्या बहिणीला फसवण्यासाठी तिने ९ महिन्याच्या मुलाला छतावरून फेकून दिले.

Namdeo Kumbhar

Crime News Update : एक ती जिजाऊ होती जिने शिवबाला घडवले आणि एक ही आई आहे जिला पाहिल्यानंतर तुमचाही राग अनावर झाल्याशिवाय राहणार नाही. तिने असं कृत्य केलं आहे की तिच्या या चुकीला माफी नाहीच. उत्तर प्रदेशमधील बलियातील एका महिलेनं आपल्या दुश्मनीसाठी पोटच्या पोराचा बळी घेतला. मोठ्या बहिणीला फसवण्यासाठी तिने ९ महिन्याच्या मुलाला छतावरून फेकून दिले. त्यामध्ये त्या चिमुकल्याचा मृत्यू झालाय. पोटच्या पोराचा जीव घेणाऱ्या महिलेचं नाव अंजू देवी असं आहे.

नेमकं प्रकरण काय आहे ?

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील बलियामधील कोतवालीच्या कृष्णा नगर मोहल्लेमधील हे सर्व प्रकरण आहे. ३५ वर्षीय अंजू देवी यांनी मोठ्या बहिणीचा बदला घेण्यासाठी पोटच्या ९ महिन्याच्या बाळाला फेकून दिले. आजी शोभा देवी यांनी मुलीच्या विरोधात नातवाची हत्या केल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी आईला ताब्यात घेऊन चिमुकल्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय.

पोटच्या गोळ्याला फेकलं, अन् जोरजोरात ओरडायला लागली

कृष्णा नगर परिसरात अंजू देवी नवऱ्यासोबत आईसोबत राहते. त्याची मोठी बहीण मनीषा देवीही आपल्या पतीसोबत इथेच राहते. दोन्ही बहिणींमध्ये दररोज वाद होत होता. शनिवारी सकाळी अंजू देवी आणि मनीषा यांच्यामध्ये जोरदार वाद झाला. या वादानंतर अंजूचा राग अनावर गेला. तिने बहिणीसमोरच पोटच्या नऊ महिन्याच्या बाळाला छतावरुन फेकले. बहिणीवर आरोप करत ओरडण्यास सुरूवात केली.

ही घटना घडली त्यावेळी अंजू देवी हिचा नवरा सिलेंडर वाटत होता. त्याचवेळी अंजूची आई शोभा देवीने पोलिसांत तक्रार दिली. नववर्षाच्या चिमुकल्याच्या हत्येचा आरोप तक्रारीत केला. तक्रारीनंतर पोलिसांनी अंजूला ताब्यात घेतले. पोलिसांनी नऊ महिन्याच्या चिमुकल्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवलाय.

मिडिया रिपोर्ट्सनुसार, शोभा देवीने आपल्या तक्रारीत अंजूचा आणखी एक कारनामा सांगितले. अंजूने तीन महिन्याआधी पोटच्या बाळाचा जीव घेतला होता. अंजूला पोलिसांनी ताब्यात घेतलेय.

कृष्णा नगर परिसरात दुधाच्या आकर्षणाच्या मुलाच्या हत्येची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली. या घटनेवर महिलांना राग अनावर आला. महिलांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत, अंजूला मृत्यूदंडा शिक्षा देण्याची मागणी केली. अंजू आईच्या नावाला एक कलंक आहे. यापूर्वीही या चिमुकल्याचा जुळा भाऊ ठार झाला होता. त्याचाही अंजूनेच बळी घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT