Kalyan Crime Saam Tv
क्राईम

Kalyan Crime : धक्कादायक घटना; तरुणाची हत्या करत मृतदेहला दगड बांधून फेकला विहिरीत

Kalyan Crime : गेल्या ६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा मृतदेह कल्याणजवळील आडीवली येथील विहिरीत आढळलाय. चंद्रप्रकाश लोवंशी असं या तरुणांचं नाव असून तो २० जानेवारीपासून बेपत्ता होता.

Bharat Jadhav

(अभिजीत देशमूख)

Kalyan Crime :

कल्याणजवळील आडीवली येथे एक धक्कादायक घटना घडलीय. एका तरुणाची हत्या करत त्याचा मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना घडलीय. चंद्रप्रकाश लोवंशी असे या मयत तरुणाचे नाव आहे. तो २० तारखेपासून बेपत्ता होता. चंद्रप्रकाश याच्यावर पाठीवर व मानेवर वार करण्यात आले आहेत. त्याची हत्या का व कोणी केली याचा तपास मानपाडा पोलीस करत आहेत. (Latest News)

डोंबिवली जवळील दावडी गावात राहणारा चंद्रप्रकाश लोवंशी हा २० जानेवारीपासून बेपत्ता होता. २५ तारखेला सकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह कल्याणजवळील आडीवली गावातील विहिरीत आढळला. त्याच्या मृतदेहाला दगड बांधलेला होता. घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान चंद्रप्रकाशच्या पाठीवर व मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार करत त्याची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. चंद्रप्रकाशची हत्या का व कोणी केली याचा तपास पोलीस करत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दारू पार्टीनंतर केला मित्राचा खून

दारू पार्टीत एका क्षुल्लक वादातून तरूणाची हत्या झाल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली होती. दरम्यान मनपाडा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. दोन मित्र पार्टनरशिपमध्ये चायनीज गाडी सुरू करणार होते. या आनंदात दोघांनी पार्टी दिली. मात्र या दारू पार्टीमध्ये शुल्लक वादातून दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राचीच हत्या केली. ही धक्कादायक घटना कल्याण पूर्व आडीवली परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास घडली. वाजिद सय्यद असं मयत तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी परेश शीलकर या तरुणाला ताब्यात घेतलंय. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : महत्त्वाची वार्ता कानी पडणार; ५ राशींच्या लोकांसाठी बुधवार गेमचेंजर ठरणार

Wednesday Horoscope: पैशाला वाटा फुटतील, कटकटी संपणार नाहीत; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Prajkta Wedding: मालिकेतील येसूबाईंचा खऱ्या आयुष्यातील शुंभराजसोबत विवाह संपन्न,पाहा प्राजक्ताच्या लग्नाचे सुंदर PHOTO

बटण पसंतीच्या उमेदवाराचं दाबलं अन् लाइट पेटली भलतीकडे; संतापलेल्या मतदाराने ईव्हीएम फोडलं

Local Body Election: आता थेट निवडणूक आयोगाला कोर्टात खेचणार; निलेश राणेंचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT