Bangalore Crime Saam Tv
क्राईम

Bangalore Crime: दारू घेण्यासाठी पैसे देण्यास मुलाचा नकार; दारूच्या नशेतच पित्याने झाडली गोळी

Bangalore Crime: एका मद्यपी वडिलांनी दारूसाठी मुलाची हत्या केल्याची घटना कामाक्षीपल्य गावात घडलीय. दारूसाठी मुलाने पैसे न दिल्याने ५८ वर्षीय व्यक्तीने परवानाधारक बंदुकीतून गोळी झाडली. सुरेश बोपण्णा असं मारेकरी पित्याचं नाव आहे. पोलिसांनी आरोपी वडील सुरेशला अटक केलीय.

Bharat Jadhav

Bangalore Crime Man Shot Dead His Son :

बेंगळुरूमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका मद्यपी वडिलांनी दारूसाठी मुलाची हत्या केल्याची घटना कामाक्षीपल्य गावात घडलीय. दारूसाठी मुलाने पैसे न दिल्याने ५८ वर्षीय व्यक्तीने परवानाधारक बंदुकीतून गोळी झाडली. सुरेश बोपण्णा असं मारेकरी पित्याचं नाव आहे. पोलिसांनी आरोपी वडील सुरेशला अटक केलीय. (Latest News)

आरोपी सुरेशने आपल्या मुलगा नॉर्थन बोपण्णाकडे दारूसाठी पैशाची मागणी केली. त्यातून वाद झाला आणि आरोपीने मुलावर गोळ्या झाडल्या. नॉर्थन बोपण्णा आणि आरोपी वडिल सुरेशमध्ये यावरून अनेकदा भांडण होत होती. दरम्यान हे कुटुंब मूळचे कोडागु जिल्ह्यातील मडिकेरी येथील राहणारे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गुरुवारी या दोघांमध्ये दारुचे पैसे न देण्यावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला. पैशासाठी आरोपी वडील त्रास देत असल्याने बोपण्णाने त्यांना जबरदस्तीने एका खोलीत बंद केले. त्यानंतर काही मिनिटांनी आरोपी सुरेशने खिडकीतून बोपण्णाच्या छातीवर गोळी झाडली. गोळी लागल्यानंतर बोपण्णा गंभीर जखमी झाला होता. त्याअवस्थेत त्याने आपल्या बहिणीला फोन करून त्याला रुग्णालयात नेण्यासाठी नातेवाईकांना कळवण्यास सांगितले. बोपण्णा यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्यांना मृत घोषित करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितले.

आरोपी वडील सुरेश यांनी सहा महिन्यांपूर्वी शहरातील एका खासगी सुरक्षा एजन्सीमध्ये गनमॅनची नोकरी सोडली होती. तेव्हापासून ते पत्नी आणि मुलासह कामाक्षीपल्य पोलीस हद्दीतील करेकल्लू येथे राहत होते. पोलिसांनी सांगितले की, बोपण्णानेही दोन महिन्यांपूर्वी नोकरी सोडली कारण त्याला त्याच्या आजारी आईची काळजी घ्यावी लागत होती. आता कामाक्षिपल्य पोलिसांनी या संपूर्ण घटनेत एफआयआर नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातील भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुले; मात्र दररोज 'इतक्याच' भाविकांना प्रवेश

Cheese Balls Recipe: लहान मुलांसाठी घरच्या घरी झटपट बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट चीज बॉल्स, वाचा सोपी रेसिपी

6,600 रुपयांच्या फायद्यासाठी 22 बळी, दारूकांडाची थरारक इनसाईड स्टोरी, आरोपी वानखेडेनं कसा रचला प्लॅन?

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

SCROLL FOR NEXT