Punjab Crime Saam Tv Twitter
क्राईम

Punjab Crime: माल रोड असोसिएशनच्या अध्यक्षाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या; VIDEO व्हायरल

Punjab Crime: भरदिवसा झालेल्या गोळीबाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Bharat Jadhav

Bathinda Crime News:

पंजाबच्या भठिंडामध्ये भरदिवसा गोळीबार करत माल रोड असोसिएशनच्या अध्यक्षाची हत्या करण्यात आलीय. हरजिंदर सिंह जौहल उर्फ मेला असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. भरदिवसा झालेल्या गोळीबाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. गोळीबार घडल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक सीटी नरिंदर सिंहसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी घटनास्थळाची तपास करत पंचनामा केला आणि गोळीबाराचा तपास सुरू केलाय.(Latest News)

प्राथमिक माहितीनुसार, दुचाकीवर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी माल रोड असोसिएशनच्या अध्यक्षांवर गोळीबार केला. अध्यक्षांवर अंधाधुंध गोळीबार केल्यानतंर हल्लेखोर दुचाकीवरून फरार झाले. हल्लेखोरांनी ५ ते ६ गोळ्या झाडल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माल रोड असोसिएशनचे अध्यक्ष त्यांच्या दुकानाबाहेर बसले होते. त्यावेळी सायंकाळचे पाच वाजेच्या दरम्यान दोन दुचाकीस्वार काही तरुण आले आणि त्यांनी हरजिंदरवर गोळीबार सुरू केला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गोळीबारादरम्यान हरजिंदर सिंह यांना चारहून अधिक गोळ्या लागल्या. गोळ्यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले. गोळीबार झाल्यानंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला याचा फायदा घेत हल्लेखोर पसार झाले.

दरम्यान गोळीबार झाल्यानंतर स्थानिक लोकांनी हरजिंदर सिंह यांना खासगी रुग्णालयात दाखल केले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. मात्र, या घटनेमागचे मुख्य कारण काय आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. घटनेनंतर एसपी सीटी नरिंदर सिंह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय. पोलीस घटनास्थळाजवळ बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT