Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting Saamtv
क्राईम

Loksabha Election 2024: खळबळजनक घटना! मतदान केंद्रात आढळला 'CRPF' जवानाचा मृतदेह

West Bengal Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting: पश्चिम बंगालमधून एक मोठी घटना समोर आली असून मतदान केंद्रामध्ये सीआरपीएफ जवानाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

Gangappa Pujari

लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. आज पहिल्या टप्प्यातील १९ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान होणार आहे. अशातच पश्चिम बंगालमधून एक मोठी घटना समोर आली असून मतदान केंद्रामध्ये सीआरपीएफ जवानाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पश्चिम बंगालमधील माथाभंगा येथे निवडणूक ड्युटीवर असलेल्या सीआरपीएफ जवानाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सीआरपीएफ जवान हा बाथरूममध्ये पडला होता, त्यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला.

ही घटना काल रात्री घडल्याचे सांगण्यात येत आहे. माथाभंगा येथील मतदान केंद्राच्या बाथरूममध्ये हा सीआरपीएफ जवान बेशुद्धावस्थेत आढळून आला. लोकांनी पाहिल्यावर शिपायाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या जवानाच्या डोक्याला दुखापत झाल्याचे रुग्णालयातील सूत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज (शुक्रवारी) होत आहे. पहिल्या टप्प्यात 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांवर मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमधील कूचबिहार, अलीपुरद्वार आणि जलपाईगुडी या तीन जागांवरही मतदान होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: साखरेच्या दरवाढीत २२ ते २५ हजार कोटींचा घोटाळा? राजू शेट्टींचा गंभीर आरोप

High cholesterol: फक्त आहारात या 5 पदार्थांचा करा समावेश; रक्तावाहिन्यांमध्ये साचलेली चरबी लगेच निघून जाईल

भाजप नेत्याचा 'हायटेक' कारनामा, एमटीएनएलच्या २० लाखांच्या केबलवर डल्ला; १३ जण गजाआड

Maharashtra Fort : कुछ तुफानी करते है! 'हा' किल्ला चढताना काळजाचा ठोका चुकतो, २,२५० फूट उंचीवरचा थरारक ट्रेक

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी खुशखबर, कोणत्याही क्षणी खात्यात हप्ता जमा होणार; सरकारने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT