Kolhapur 
क्राईम

Kolhapur Crime: बिबट्याची कातडी पोत्यात भरली, विक्रीसाठी बाजार गाठलं अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकली

Crime News: कोल्हापुरातील तपोवन मैदान येथे बिबट्याचे कातडे विक्री साठी आलेल्या चंदगड येथील बाबू सखाराम डोईफोडे आणि धाकलू बाळू शिंदे या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली.

Dhanshri Shintre

चंदगडमध्ये बिबट्याची शिकार करून त्याचे कातडे एका प्लास्टिक पोत्यात ठेऊन कोल्हापूरातील तपोवन मैदान परिसरात विक्रीसाठी आणण्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या संदर्भात पोलिसांनी एक सापळा रचला आणि कंळबा रोडवर मोटारसायकलवर प्लास्टिक पोते घेऊन येत असलेल्या दोन संशयितांना पकडले.

सुरुवातीला या दोघांनी पोलिसांना चुकवण्यासाठी उडवा उडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी त्यांना अधिक विश्वासात घेऊन चौकशी सुरू केली. अधिक तपास केल्यावर, पोलिसांनी त्या दोघांच्या कडील प्लास्टिक पोत्याची झडती घेतली. या झडतीत बिबट्याचे कातडे सापडले. यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आणि अधिक तपास सुरू केला.

सदर दोघांच्या ताब्यातून पोलिसांनी एकूण ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, ज्यात बिबट्याचे कातडे, ४० हजार रुपये किमतीची मोटारसायकल, आणि १० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल समाविष्ट होते. या मुद्देमालासह दोघांना वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी याबाबत अधिक तपास सुरू केला असून, बिबट्याच्या कातड्याची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जात आहे. वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी पोलिसांनी असे प्रकार रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याचे ठरवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या आधी साताऱ्यात ठाकरे गटाला धक्का; बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

सुकन्या समृद्धी योजना, PPF मध्ये गुंतवणूक करताय? सरकारने जाहीर केले नवे व्याजदर, फायदा की झटका?

Maharashtra News Live Update: FIR मध्ये मिनाक्षी शिंदेंचं नाव टाका- संजय राऊत

Sambhajinagar : मराठवाड्याचं 'महाबळेश्वर'! निसर्ग सौंदर्याने नटलंय 'हे' थंड हवेचं ठिकाण

पितृपक्षात सोनं खरेदी करावे की नाही? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT