Crime News Saam tv
क्राईम

Crime News : प्रेयसीच्या मुलाने पँटवर लघवी केल्याने तो संतापला; अमानुष मारहाणीत ४ वर्षीय बाळाचा मृत्यू

kurla Crime News : प्रेयसीच्या मुलाने पँटवर लघवी केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत मुलांच्या आईने पोलिसांत तक्रार केली आहे.

Ruchika Jadhav

रागात माणसाच्या हातून काय घडेल आणि काय नाही याचा काही नेम नसतो. कुर्ल्यामध्ये रागाच्या भरात अशीच एक दुर्दैवी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. प्रेयसीच्या मुलाने पँटवर लघवी केल्याने त्याला बेदम मारहाण केली आहे. ४ वर्षीय चिमुकल्याचा या मारहाणीत मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मुलाच्या आईवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मृत मुलाची तिच्या प्रियकरासोबत राहत होती. सकाळी ती कामावर गेली असता घरी प्रियकर आणि तिची लहान मुलं होती. यातील एका ४ वर्षांच्या मुलाने महिलेच्या प्रियकराच्या पँटवर लघवी केली. याचा प्रियकराला राग आला. त्याला रागावर नियंत्रण ठेवणे कठीण झाले. त्यामुळे त्याने थेट या मुलाला मारहाण करण्यास सुरूवात केली.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार,रितेश अजय चंद्रवंशी (वय, १९)असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. त्याने मुलाला इतकी मारहाण केली त्याचा यात मृत्यू झाला. रितेश त्याची प्रेयसी आणि तिची लहान मुलं यांच्यासह कुर्लातील पत्राचाळीत राहत होता. त्याची प्रेयसी मुळची पटना येथील आहे. तिने पतीपासून विभक्त झाल्यावर रितेशसोबत मैत्री केली. रितेश बरोबर मैत्री झाल्यावर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि ती मुलांसह त्याच्यासोबत राहण्यासाठी आली.

महिला घरी आली तेव्हा तिच्या मुलांनी घडलेली घटना तिला सांगितली. तिने आपल्या मुलाला लगेचच राजावाडीमध्ये दाखल केलं मात्र तेथून पुन्हा सायनला घेऊन जाण्याचा सल्ला दिला गेला. मुलावर उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे. महिलेने या प्रकरणी प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BRICS साठी 2 डझन देश एकत्र; भारताच्या नेतृत्वात झाले 5 मोठे निर्णय

Maharashtra News Live Update: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची उद्या दुपारी महत्त्वाची पत्रकार परिषद

Marathi Actress: गाडी अडवली, पैसे मागितले अन् मारहाण केली...; 'लागिरं झालं जी' फेम अभिनेत्रीसोबत पुण्यात धक्कादायक प्रकार

Maharashtra Politics: अर्धा तास चर्चा नंतर एकाच कारमधून प्रवास; शिंदे आणि शहांमध्ये शिजतंय काय? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Sleeping Position : डावी की उजवी कुशी? झोपण्याची कोणती पोझिशन आरोग्यसाठी आहे बेस्ट, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT