sangli crime news  Saam Tv
क्राईम

Crime News: युवकाचा दगडाने ठेचून खून, छेडछाडीच्या कारणातून हत्या झाल्याची शक्यता

Sangali News: सांगली शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना वाढत आहे. आज सांगली येथील कुपवाड परिसरातील घटनेने संपूर्ण सांगली शहर हादरले आहे.

Omkar Sonawane

विजय पाटील, साम टीव्ही

सांगली: सांगलीतील कुपवाडमधील प्रकाशनगर येथे ३८ वर्षीय राहुल सूर्यवंशी याचा निर्घृण खून करण्यात आला आहे. लोखंडी रॉडने मारहाण करून आणि दगडाने ठेचून त्याला ठार मारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, राहुल सूर्यवंशी हा नात्यातील एका मुलीचा वारंवार छळ करीत होता. त्याला अनेकदा समजावून सांगण्यात आले होते. मात्र, तो ऐकण्यास तयार नव्हता. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकाने त्याच्यावर हल्ला केला. यात त्याचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

घटनेची माहिती मिळताच कुपवाड एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संशयित आरोपी सौरभ सावंत (वय २२) याला ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे

आई आणि लेकानं मिळून केली बापाची हत्या

काल सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये एका घटनेने संपूर्ण तालुका हादरला.आपल्या पतीच्या विम्याचे पैसे मिळावे म्हणून पत्नीने आपल्या मुलाच्या मदतीन पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील यांच्यावर कर्जाचे डोंगर होते.ते त्या कर्जामुळे हताश झाले होते.हे कर्ज फेडण्यासाठी पत्नीने आपल्या पतीची हत्या केली,याबाबत अधिक माहिती अशी की,पतीच्या विम्याच्या पैशांवर पत्नीचा डोळा होता. हेच पैसे घेऊन पत्नीला कर्ज फेडायचे होते. यासाठी तिने सापळा रचून तिच्या मुलाच्या साथीने आणि मुलाच्या मित्राच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये मृत्यूचा सापळा ठरलेल्या पुलावरून कालव्यात कार कोसळली, अपघातात तिघे गंभीर जखमी

Monday Horoscope: कामाच्या नव्या संधी मिळतील, ५ राशींचे प्रेमसंबंध सुधारणार; वाचा सोमवारचे खास राशीभविष्य

Summer Konkan Tourism : धुक्याची चादर अन् थंडगार वारा; मे महिन्यात करा कोकण वारी, पाहा 'ही' ५ Hidden हिल स्टेशन्स

काँग्रेसचा वरिष्ठ नेता हरपला; पक्षाला मोठा हादरा

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिवसेनेत राजीनाम्याचा 'लेटर बॉम्ब', बड्या नेत्याने साथ सोडली

SCROLL FOR NEXT