Crime News saam tv
क्राईम

Kota Crime News : टिफिन बॉयनं केलं भयंकर कृत्य, दारू पाजून १५ वर्षीय विद्यार्थीनीवर अत्याचार

Crime News: 'नीट' परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थीनीवर टिफिन बॉयने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kota Crime News :

'नीट' परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थीनीवर टिफिन बॉयने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. कोटा जिल्ह्यात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी आरोपी तरूणाला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थीनीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. संशयित आरोपी तरूण टिफिन देण्याचे काम करतो. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी आणि हॉस्टेल मालकाला अटक केली आहे.

पीडित अल्पवयीन मुलगी (वय १५) मूळची बिहारची रहिवासी आहे. ती नीटची तयारी करण्यासाठी तिच्या बहिणीसोबत कोटा येथे वसतिगृहात राहते. संशयित आरोपी हा टिफिन देण्याचे काम करतो. तो मूळचा पिपळदा परिसरातील रहिवासी आहे. तो सध्या कोटा येथील बालाजी नगर भागात राहतो. वसतिगृह मालक मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील रहिवासी आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी हा पीडित तरूणीच्या वसतिगृहात जेवण देण्यासाठी यायचा. याच काळात आरोपी तरूण आणि पीडितेची ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीनं तरूणीला दारू पाजली. तिच्यावर बलात्कार केला. या लज्जास्पद कृत्याचा त्याने व्हिडिओही काढला. आरोपी तरूण तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता. या प्रकरणी तिनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

हॉस्टेल मालकाकडं मदत मागितली, पण...

मुलीनं वसतिगृह मालकाकडं मदतही मागितली. पण त्यानं मदत करायची सोडून आरोपी तरुणाशी लग्न करण्याचा सल्ला दिला. ऐकलं नाही तर बदनामीची धमकी दिली. मुलीवरच त्याने आरोप केले. अखेर त्रासाला कंटाळून पीडितेनं थेट पोलीस ठाणे गाठले. आरोपी तरूण आणि वसतिगृह मालकाविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT