Thief Arrested Saam Tv
क्राईम

Kalyan Crime: बापानं मुंबईत आणलं, पाणीपुरीची गाडी टाकली, पण पोरगा सुधारलाच नाही; मंदिरातील चोरीमुळं खरा चेहरा आला समोर

Thief Arrested : आशिष मोरया हा मूळचा उत्तर प्रदेश येथील राहणारा असून तो सराईत चोर आहे. उत्तर प्रदेशात असताना त्याने येथे अनेक ठिकाणी चोऱ्या केल्या होत्या. त्याच्याविरोधात उत्तर प्रदेशमधील विविध पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. चोरी करणं त्याने सोडावं म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला पाणीपुरीचा व्यवसाय सुरू करून दिला होता.

Bharat Jadhav

(अभिजीत देशमुख)

Kolshewadi police Arrested Thief:

जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही ही म्हण आपण सर्वांनी ऐकली असेल. ह्या म्हणीची प्रचिती कल्याणमधील चोरीची घटनेनंतर झाली. चोरीचा मार्ग वाईट असतो. त्या मार्गावर जाऊ नये म्हणून चोराच्या वडिलांनी त्याला समज दिली परंतु त्याची चोरी करण्याची सवय सुटलीच नाही. दरम्यान मंदिरात चोरी केल्याप्रकरणी कल्याण पोलिसांनी उत्तर प्रदेशातील चोराला अटक केलीय. (Latest News)

कल्याण (Kalyan) पूर्वेकडील करपेवाडी परिसरात एका मंदिरातील दानपेटीदमधील रक्कम चोरीला गेल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. हा चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. कोळशेवाडी पोलिसांनी ओळख पटवत या चोरट्याला बेड्या ठोकल्या. आशिष मोरया असं या चोरट्याचं नाव असून तो उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे. उत्तर प्रदेशचा सराईत चोरटा असून त्याच्याविरोधात उत्तर प्रदेशमधील विविध पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला सुधारण्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याला मुंबईला आणले. त्याला पाणीपुरीचा व्यवसाय सुरू करून दिला. महिनाभर त्याने पाणीपुरीचा व्यवसाय केला मात्र पुन्हा त्याने चोरीचाच मार्ग पत्कारला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेच्या प्रकरणी अधिकची माहिती मिळाल्यानुसार, कल्याण पूर्वेकडील करपेवाडी परिसरात असलेल्या एका मंदिरातील दानपेटीतून ८ते १० हजार रुपये रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या मदतीने पोलिसांनी आशिष मोरया या चोरट्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांच्या तपासादरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आलीय.

आशिष मोरया हा मूळचा उत्तर प्रदेश येथील राहणारा असून तो सराईत चोर आहे. उत्तर प्रदेशात असताना त्याने येथे अनेक ठिकाणी चोऱ्या केल्या होत्या. त्याच्याविरोधात उत्तर प्रदेशमधील विविध पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या या गुन्हेगारी प्रवृत्तीला कंटाळून तो सुधरेल या हेतूने त्याच्या वडिलांनी त्याला मुंबईत आणले होते. कल्याणमध्ये त्याला पाणीपुरीचा व्यवसाय सुरू करून दिला. त्याने महिनाभर पाणीपुरीचा व्यवसाय केला. मात्र झटपट पैसा कमावण्याच्या हव्यासापोटी आशिष पुन्हा चोरीच्या मार्गाकडे वळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भोंदू अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल

Success Story: १०वी-१२वीत टॉपर; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; IFS आदिती यांचा प्रेरणादायी प्रवास

Nashik Accident: दिंडोरीत भीषण अपघात; कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा मृत्यू

किडनी विकणाऱ्या शेतकऱ्याला हवं इच्छामरण; जीवंतपणीच्या मरणयातना कधी थांबणार? VIDEO

शिवसेनेच्या इतिहासावरून नाईकांचा शिंदेंना अप्रत्यक्षपणे टोला; एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांचा वाद पुन्हा पेटणार?

SCROLL FOR NEXT