kolhapur police hits hotel owner video viral saam tv
क्राईम

Kolhapur Crime News : काेल्हापूरात पोलिसाची हाॅटेल मालकाला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद (video)

Kolhapur Latest Marathi News : या झटापटीत हाॅटलेमधील खूर्च्यांचे नुकसान झाले. हॉटेल चालकाला मारहाण केल्याचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur :

कोल्हापूर जिल्ह्यात एका पोलिस कर्मचाऱ्याने मद्यप्राशन करून हॉटेल चालकाला मारहाण केल्याची घटना समाेर आली आहे. हाॅटेल चालकाने बिल मागितल्याने पाेलिस कर्मचा-याने मारहाण केल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. या घटनेबाबत अद्याप पाेलिसांत तक्रार नाेंदविण्यात आलेली नसली तरी मारहाणीचा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोल्हापूर जिल्ह्यातील एका हाॅटेलमध्ये याच जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याने मद्यप्राशन केले. त्यांना हाॅटेल चालकाने त्याचे बिल मागितले. त्यामुळे पाेलिस कर्मचारी संतप्त झाला. त्याने हाॅटेल चालकाशी वाद घातला.

त्यानंतर पाेलिस कर्मचा-याने हॉटेलमध्ये धिंगाणा घातला. तसेच हाॅटेल चालकास मारहाण केली. या झटापटीत हाॅटलेमधील खूर्च्यांचे नुकसान झाले. हॉटेल चालकाला मारहाण केल्याचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे.

दरम्यान या घटनेमुळे कोल्हापूर पोलिस दलाची अब्रू वेशीला टांगली गेल्याची चर्चा परिसरात सुरु आहे. या घटनेबाबत अद्याप पाेलिसांत तक्रार नाेंदविण्यात आलेली नसल्याची माहिती समाेर आली आहे.

(Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना बसणार मोठा धक्का; बड्या महिला नेत्या भाजपमध्ये प्रवेश करणार?

चार दिवस काम ३ दिवस सुट्टी; भारतात लागू होणार नवा नियम? कसं असेल तुमच्या ड्युटीचं शेड्यूल

परीक्षा देऊन विद्यार्थिनी रिक्षाने घरी निघाली; रस्त्यात चालकाची नियत फिरली; निर्जनस्थळी अब्रू लुटली

Amaravati Accident : भयंकर! दरीत कोसळणाऱ्या बसला अडवताना विपरीत घडलं, चालकाचा जागीच मृत्यू

Beed Crime: कराड गँगची जिल्हा कारागृहात दादागिरी; पोलीस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

SCROLL FOR NEXT