Maharashtra Latest News:  Saamtv
क्राईम

Kolhapur News: बिछाना ओला केला म्हणून संतापली, सावत्र आईने ५ वर्षांच्या मुलीला दिले चटके; कोल्हापूरमधील मन सुन्न करणारी घटना

Gangappa Pujari

रणजित माजगावकर, कोल्हापूर| ता. १४ सप्टेंबर

Kolhapur Crime News: अंथरुणात लघुशंका करत असल्याच्या कारणातून सावत्र आईने पाच वर्षाच्या मुलीला लोखंडाचे गरम चटके दिल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरमधून समोर आली आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी इथे घडलेल्या या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत असून याप्रकरणी शुभम मगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पूजा मगरे हिच्या विरोधात शिरोली एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पूजा मगरे या सावत्र आईला ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी इथ अंथरुणात लघुशंका करत असल्याच्या कारणातून सावत्र आईने पाच वर्षाच्या मुलीला लोखंडाचे गरम चटके दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शुभम मगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पूजा मगरे हिच्या विरोधात शिरोली एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पूजा मगरे या सावत्र आईला ताब्यात घेतलं आहे.

शुभम गोविंद मगरे हे त्यांची पत्नी पूजा हिच्यासोबत हातकणंगले तालुक्यातील कासरवाडी गावात राहतात. दोघांचाही हा दुसरा विवाह असून दोघानाही पूर्वीची अपत्ते आहेत. काल शुभम मगरे हे कामानिमित्त बाहेर गेले असताना त्यांची पत्नी पूजा मगरे हिने अंथरुणात लघु शंका करत असल्याच्या कारणावरून त्यांच्या पाच वर्षीय बालिकेला लोखंड उलतने गरम करून चटके दिलेत.

यामध्ये ही पाच वर्षीय बालिका जखमी झाली. शुभम मगरे हे कामावरून परत आल्यानंतर हा गंभीर प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. शुभम मगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पूजा मगरे हिच्या विरोधात शिरोली एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री पोलिसांनी पूजा मगरे हिला ताब्यात घेतले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT