Kolhapur Kalamb Jail Breaking News:  Saamtv
क्राईम

Kolhapur Breaking News: कळंबा कारागृहात कैद्यांमध्ये राडा, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची हत्या; कोल्हापूर हादरलं!

Kolhapur Kalamba Jail Breaking News: या मारहाणीत मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल याची हत्या करण्यात आली आहे. मुन्ना हा 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी असल्याचे सांगण्यात येत असून या घटनेने कोल्हापूर जिल्हा हादरुन गेला आहे.

Gangappa Pujari

रणजित माजगावकर| कोल्हापूर, ता. २ जून २०२४

कोल्हापूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापुरच्या कळंब कारागृहात कैद्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. या मारहाणीत मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल याची हत्या करण्यात आली आहे. मुन्ना हा 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी असल्याचे सांगण्यात येत असून या घटनेने कोल्हापूर जिल्हा हादरुन गेला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोल्हापुरमधील कळंबा कारागृहात आज कैद्यांच्या दोन गटांमध्ये मारामारी झाली. या मारहाणीत मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता याची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण पोलीस प्रशासन हादरुन गेले असून कारागृहातील बेशिस्त पुन्हा आली चव्हाट्यावर आली आहे.

मारहाणीत मृत्यू झालेला मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता हा १९९३च्या मुंबई बाँम्बस्फोटातील आरोपी असून तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता, अशी माहिती समोर आली आहे. आज सकाळी साडेसात वाजण्याचे सुमारास कारागृहातील तो हौदावर आंघोळ करण्यासाठी गेला असता त्याचा इतर कैद्यांशी वाद झाला.

यावेळी न्यायालयात बंदी असलेले आरोपी न्यायालयीन बंदी आरोपी प्रतीक उर्फ पिल्या सुरेश पाटील, दीपक नेताजी खोत, संदीप शंकर चव्हाण, ऋतुराज विनायक इनामदार , सौरभ विकास सिद्ध या पाच जणांनी ड्रेनेजवरील लोखंडी झाकणाने मुन्ना याला जोरदार मारहाण केली. या मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून जुना राजवाडा पोलिसांकडून कारागृहात खुनाच्या घटनेचा पंचनामा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT