Kolhapur Crime News Saam Tv
क्राईम

Shocking : कोल्हापूर हादरलं! वादाने टोक गाठलं, नवऱ्याने पत्नीला बेदम मारलं; जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Kolhapur Crime News : कोल्हापुरात पतीकडून झालेल्या मारहाणीत एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपी पती फरार असून लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • कोल्हापुरात पतीकडून झालेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला

  • स्वाती गणेश हुबाळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू

  • आरोपी गणेश हुबाळे सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत

  • नातेवाईकांकडून आरोपीला अटक करण्याची मागणी

कोल्हापुरात पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वाती गणेश हुबाळे असे मृत महिलेचे नाव असून एका आठवड्यापूर्वी तिच्या पतीने तिला शुल्लक कारणावरून मारहाण केली. या मारहाणीत स्वाती गंभीर जखमी झाल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधीत महिलेच्या पती विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश शंकर हुबाळे असे संशयित आरोपीचे नाव असून तो सध्या फरार आहे. स्वाती आणि गणेश यांचा २०१२मध्ये प्रेमविवाह झाला. त्या दोघांना दोन मुलं आहेत. गणेशचे फेट्याचे दुकान असल्याचे समजते आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून स्वाती आणि गणेश यांच्यात वारंवार भांडण होत होती. स्वातीने याबाबत माहेरच्या मंडळींना कल्पना दिली होती. भाऊ प्रवीण यांनाही तिने पतीकडून होणार्‍या छळाबाबत माहिती दिली होती.

माहेरकडील मंडळींनी हस्तक्षेप करून त्यांच्यात सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गणेश ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. ७ फेब्रुवारी रोजी या दोघांमध्ये टोकाचा वाद झाला. या वादातून गणेशने स्वाती यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत स्वाती गंभीर जखमी झाल्या. गणेशने ही माहिती स्वातीच्या माहेरकडील मंडळींना न कळविता ती बेपत्ता असल्याची माहिती दिली. या घटनेनंतर माहेरकडील नातेवाईकांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र पोलिसांनी २४ तास थांबण्याचा सल्ला दिला. दरम्यानच्या काळात स्वाती या कदमवाडी येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याची माहिती मिळाली. नातेवाईकांनी स्वाती यांची भेट घेऊन तिच्याशी संभाषण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी स्वाती यांनी मारहाण झाल्याचे सांगितले.

दरम्यान सोमवारी दुपारी स्वाती हिचा उपचार सुरू असताना रुग्णालयात मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाईकांनी रुग्णालयासह लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. स्वाती यांच्या पतीला अटक झाल्याशिवाय मृतदेहाला हात लावणार नसल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटलं. संशयित आरोपी गणेश हुबाळे सद्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खासदार होताच पार्थ पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, 'शिवतीर्था'वर खलबतं; नेमकी चर्चा काय?

Maharashtra Live News Update: खासदार पार्थ पवार राज ठाकरेंच्या भेटीला

मुंबईत २६४० घरांची निघाली लॉटरी, हक्काच्या घरासाठी कसा कराल अर्ज? किती असेल किंमत? वाचा A टू Z माहिती

खेळता खेळता 6 वर्षाच्या चिमुकल्याने लोहचुंबक गिळला; डॉक्टरांनी शस्त्रक्रिया न करता वाचवला जीव

Bank Holiday: राज्यात बँकांना सलग ६ दिवस सुट्ट्या; महाराष्ट्रात काय स्थिती? वाचा सुट्ट्यांची यादी

SCROLL FOR NEXT