kalyan Crime News Saam Tv
क्राईम

kalyan Crime News: प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या सराईत चोरांना अटक; कल्याण रेल्वे पोलिसांची कारवाई

Crime News: कल्याण, डोंबिवली ,अंबरनाथ ,उल्हासनगर अशा गर्दीच्या रेल्वे स्टेशनवर मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या.

Bharat Jadhav

kalyan Crime News:

कल्याण रेल्वे पोलिसांनी दोन सराईत मोबाईल चोरांना बेड्या ठोकल्या आहेत. अशोक गायकवाड आणि नरेश गायकवाड अशी या दोन सराईत चोरट्यांची नावे आहेत. पोलिसांनी या दोघांकडून चोरलेले १७ मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले. तसेच यांनी केलेल्या ९ गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केलीय. दरम्यान या दोघांनी आणखी काही गुन्हे केले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केलाय. (Latest News)

कल्याण, डोंबिवली ,अंबरनाथ ,उल्हासनगर अशा गर्दीच्या रेल्वे स्टेशनवर मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. रेल्वे स्टेशनवरील लोकलमधील गर्दीचा फायदा घेत हे चोरटे प्रवाशांच्या खिशातील मोबाईल चोरत होते. त्यातच १४ तारखेला कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीची तक्रार दाखल झाली. कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्यांचा तपास सुरू केला.

मोबाईल चोरी करणाऱ्या या २ चोरट्यांना पोलिसांनी अंबरनाथ येथून अटक केली . अशोक गायकवाड आणि नरेश गायकवाड अशी या चोरट्यांची नावे आहेत. हे दोघे सराईत गुन्हेगार असून या दोघांविरोधात विविध पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. कल्याण रेल्वे पोलिसांनी आतापर्यंत ९ गुन्ह्यांची उकल केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नागपूर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना ई-रिक्षा वाटप

कंबरेला स्पर्श, किस करण्याचा प्रयत्न; दिवाळीच्या जत्रेत मुलीशी छेडछाड, घटनेचा Video Viral

Shehnaaz Gill: दिवाळी स्पेशल शहनाज गिलचा क्यूट व्हेल्व्हेट अनारकलीतील लूक, पाहा PHOTO

Blackheads: चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स होतील गायब, स्कीन करेल ग्लो; फक्त करा 'या' सोप्या गोष्टी

Museum Robbery: दिवसाढवळ्या लूव्र संग्रहालयात दरोडा; नेपोलियन आणि जोसेफिनचे दागिने चोरीला

SCROLL FOR NEXT